
Ranveer Singh Replaces Shahrukh Khan In Don 3: बॉलिवूडच्या किंग खानच्या अभिनयाची भूरळ सर्वांनाच पडली आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांना दिल्यानंतर त्याच्या आणखी एका चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर होत आहे. ‘डॉन’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक सर्वांनाच दाखवत त्याने आपले नाव अधिकच प्रसिद्ध केलं. फरहान अख्तर ‘डॉन ३’ च्या कथेवर अद्याप काम करत आहे. पण शाहरूखने या चित्रपटाला नकार दिला असून दुसऱ्या अभिनेत्यालाच यामध्ये संधी देण्यात आली आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात शाहरुखसोबत अमिताभ बच्चन आणि आणखी एका नव्या चेहेऱ्याला संधी देत कास्टिंग करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सध्या मिळत आहे. शाहरुखला ही कल्पना आवडली नसल्यानं त्याने चित्रपटाला नकार दर्शवला. त्याला ज्या प्रकारचे चित्रपट करायचे त्यात ‘डॉन ३’ शोभत नसल्यानं त्याने चित्रपटाला नकार दिला. नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, ‘डॉन ३’ मध्ये शाहरूखच्या ऐवजी रणवीर सिंगचे नाव फायनल झाल्याची माहिती मिळत आहे. रणवीरसोबत चित्रपटातील एक व्हिडिओही शूट करण्यात आला असल्याने निर्मात्यांना विलंब न करता लवकरच या चित्रपटाची घोषणा करायची आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, एक्सेल एंटरटेनमेंट सध्या शाहरुखची जागा कोणता अभिनेता घेऊ शकतो. सध्या ते असा अभिनेता शोधत आहेत, ज्याने त्यांच्यासोबच आधी दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अटींमध्ये मोजकेच कलाकार बसत आहेत. ते म्हणजे आमिर खान, हृतिक रोशन, रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी. या सर्वांमध्ये निर्मात्यांना रणवीर सिंगच बेस्ट कलाकार वाटत असल्याने त्यांनी त्याची निवड केली आहे. रणवीर सिंगबद्दल बोलायचे तर, त्याने एक्सेलसोबत, ‘दिल धड़कने दो’ आणि ‘गली बॉय’ या दोन चित्रपटांत काम केले आहे. परंतू रणवीरला सध्या काही भिती भेडसावत आहे. त्याला शाहरूखच्या पावलावर पाऊल टाकत आपण तशीच प्रतिमा तयार करू का असा सवाल पडला आहे. (Bollywood Actor)
सोबतच न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘डॉन ३’ साठी रणवीर सिंगचे नाव फायनल झाले आहे. कास्टिंगमधील या बदलाची माहिती शाहरुखला देण्यात आली आहे. त्याला साहजिकच आक्षेप नाही. एक्सेल एंटरटेनमेंटला असा स्टार हवा होता जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल. ‘डॉन ३’ची लवकरच घोषणा होणार असल्याचेही याच रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. यासाठी निर्मात्यांनी रणवीरसोबत एक व्हिडिओही शूट केला आहे. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता निर्माते लवकरच चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सोबतच चित्रपटाचे नाव ‘डॉन ३’ किंवा ‘डॉन ३.०’ असं शकण्याची शक्यता आहे. पहिल्या भागात बिग बी अमिताभ बच्चन तर दुसऱ्या भागात शाहरूख खान आणि आता तिसऱ्या भागातील कलाकाराला समोर ठेवतंच चित्रपटाची कथा लिहिण्यात येणार आहे. त्यानुसार स्क्रिप्टमध्येही बदल करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या डेब्यूमध्ये शाहरूख ऐवजी रणवीर सिंग दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला येत्या २७ मे पासून सुरूवात होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.