ऐश्वर्याने व्यक्त केली इच्छा; पुन्हा अभिषेकसोबत...

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेक बच्चनसोबतची एक इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा पूर्ण झाल्यास तिचं आणि अभिषेकचं एक स्वप्न पूर्ण होईल.
ऐश्वर्याने व्यक्त केली इच्छा; पुन्हा अभिषेकसोबत...
aishwarya and abhishek BachchanSaam TV

मुंबई : बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री (actress) जिने विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे. ती म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan).आपल्या दिलखेचक अदानी ती नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. अशा या विश्वसुंदरीने पती(actor) अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)सोबतची एक इच्छा व्यक्त केली आहे. ही इच्छा पूर्ण झाल्यास तिचं आणि अभिषेकचं एक स्वप्न पूर्ण होईल, असे तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

aishwarya and abhishek Bachchan
Anupamaa : अनुपमा आणि अनुजच्या प्रेमात नवा ट्विस्ट; बरखाने रचलं कटकारस्थान

ऐश्वर्या-अभिषेकने अनेक हिट चित्रपट एकत्र केले आहेत. 'गुरु' (Guru), 'रावण' (Raavan), उमराव जान (Umrao Jaan), 'ढाई अक्षर प्रेम के' (Dhaai Akshar Prem Ke), 'सरकार राज' (Sarkar Raj), 'धूम २' (Dhoom 2) आणि 'कुछ ना कहो' (Kuch Naa Kaho)या चित्रपटांमधून या जोडीने दबदबा निर्माण केला आहे. या चित्रपटांमुळे या जोडीने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याशिवाय ही जोडी इतर अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये एकत्र काम करताना दिसली. अशा परिस्थितीत या जोडीला दीर्घकाळानंतर रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

aishwarya and abhishek Bachchan
कतार एअरवेजबाबत कंगना रणौतने केली 'मोठी चूक',! म्हणाली, मूर्ख माणूस...

ऐश्वर्या आणि अभिषेकला एकमेकांसोबत करायचे पुन्हा एकत्र काम

नुकतीच ऐश्वरर्या रायने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिषेकसोबत सिनेमात पुन्हा एकत्र काम करण्यावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर ऐश्वर्या म्हणाली, 'असे झाले तर माझा आणि अभिषेकचा तो ड्रीम प्रोजेक्ट असेल.' तसेच काही महिन्यापूर्वी अभिषेक बच्चनने एका वृतपत्राच्या मुलाखतीत ऐश्वर्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चांगल्या पटकथेच्या शोधात असल्याचे देखील सांगितले होते.

ऐश्वर्या हिचा 'पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ऐश्वर्या डबल रोल करणार असून मणीरत्नम या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तसेच अभिषेक बच्चन याचा 'दसवीं' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शिक्षणाचं महत्व पटवून दिलं आहे.तर या चित्रपटामध्ये यामी गौतम आणि निम्रत कौर या अभिनेत्रींनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

Edited By - Shruti Kadam

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com