
मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehata Ka Oolta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. पण या शोशी संबंधित अशा काही घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे कोणच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं. नेहमी लोकांना हसवणाऱ्या या शोशी संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली होती.
२०२० हे गेल्या अनेक वर्षांपेक्षा खूप वेगळे आणि दुःखद घटनांनी भरलेले वर्ष होतं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून लोक केवळ घरातच बंदिस्त झाले नाहीत तर मनोरंजन जगतालाही त्याचा दुहेरी फटका बसला आहे. काम बंद झाल्यामुळे अनेक कलाकार बेरोजगार झाले, तर मनोरंजन उद्योगाने या काळात काही अष्टपैलू कलाकार गमावले आहेत. इरफान, खान, ऋषी कपूर(Rishi Kapoor), सरोज खान, सुशांत सिंग राजपूत हे या कलाकारांनी याच वर्षी जगाचा निरोप घेतला. या कलाकारांप्रमाणे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा लेखक अभिषेक मकवाना यानेही आत्महत्या करून आपले जीवन संपवले.
एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार, २७ नोव्हेंबर २०२० रोजी अभिषेकने त्याच्या कांदिवली अपार्टमेंटमध्ये फाशी घेतल्यानंतर चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. अभिषेकचा भाऊ जेनिस याने एका वृत्तपत्राला सांगितले होते की, अभिषेक आर्थिक सापळ्यात सापडला होता. अभिषेकच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कर्जदारांकडून त्याला शिवीगाळ करणारे फोन येऊ लागले.
जेनिस पुढे म्हणाला, 'मला ईमेल रेकॉर्डवरून समजले माझ्या भावाने यापूर्वी 'आसन लोन' अॅपवरून एक लहान कर्ज घेतले होते ज्याचा व्याजदर खूप जास्त होता. माझ्या भावाचा व्यवहार मी जवळून पाहिला. माझ्या लक्षात आले की माझ्या भावाने कर्जासाठी अर्ज केला नव्हता तरी तो पैसे पाठवत होता. त्यांचे व्याजदर ३० टक्क्यांपर्यंत होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.