
During Shoot Of Indian Police Force Rohit Shetty Gets Injured: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. रोहित शेट्टी 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसीरीजचे शूटिंग करत आहेत. या वेबसीरीजच्या चित्रकारणादरम्यान रोहित शेट्टी जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला लागले आहे.उपचारासाठी त्यांना कामिनेनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची छोटे ऑपरेशन केले आहे.
रोहित शेट्टी त्यांच्या अॅक्शन चित्रपटासाठी ओळखले जातात. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये फाईट आणि अॅक्शन अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये घडतात. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये स्टार्स कार, बाईक आणि हेलिकॉप्टरने फाईट करतात. गाड्या एकमेकांवर आदळतात, तुटतात आणि कधी हिरो त्यांच्यावर उभे राहत एन्ट्री करतो. चित्रपटाच्या लूकवरूनच कोणीही ओळखू शकता की हा चित्रपट रोहित शेट्टीने बनवला आहे. रोहित शेट्टी टीव्ही शो खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करतात आणि खेळाडूंना ते करायला लावतो.
रोहित शेट्टी बॉलिवूडमध्ये त्यांच्या अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखले जातात. 2022 हे वर्ष रोहित शेट्टीसाठी खास नसलं तरी 2023 मध्ये रोहित शेट्टी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. आता 2023 मध्ये, रोहित शेट्टी अजय देवगणच्या सिंघम 3, सिद्धार्थ मल्होत्राच्या इंडियन पोलिस फोर्स वेब सीरिज, सूर्यवंशी 2 आणि गोलमाल 5 सारखे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.