
मुंबई : बॉलिवूड प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण ७' (Koffee With Karan) सेलिब्रिटींच्या दिलखुलास गप्पामुळे चर्चेत आहे. पहिल्या भागापासून कॉफी विथ् करण हा शो प्रेक्षकांच्या पंसतीस आला आहे. आतापर्यत शोमध्ये बॉलिवूडच्या एकाहून एक दिग्गज सेलिब्रिटींनी सामील होऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. शो दरम्यान प्रत्येक स्टारच्या पर्सनल लाईफवर ताशेरे ओढणारा शोचा होस्ट करण जोहरने यावेळी स्वतःबद्दलचा खुलासा केला आहे.
लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ् करण ७' सध्या तूफान चर्चेत आहे. शोमध्ये होस्ट करण जोहर (Karan Johar) उपस्थितांना आपल्या खास शैलीत प्रश्न विचारतो. दरम्यान स्टार्स त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याशी संबंधित अनेक रंजक खुलासे करून चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. अलीकडेच कॉफी विथ करणच्या ७ सीझनच्या आगामी भागात अनिल कपूर आणि वरुण धवन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मनमुराद गप्पा मारल्या आहेत. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान करणने एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर प्रश्न केले. आणि अभिनेत्याचे होश उडवले. याचदरम्यान वरूणने संधी पाहून करण जोहरच्या पर्सनल लाईफबद्दल ताशेरे ओढले. करण जोहरच्या धक्कादायक उत्तराने उपस्थितासह चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
वरुणने गप्पा मारता मारता , करणला रिलेशनशिपमध्ये कोणाची फसवणूक केली आहेस का? की तुझी फसवणूक झाली आहे. असे विचारले. करणने यावर काहीही सांगण्यास नकार दिला "तु हे माध्यमासमोर बोलत आहेस" असे वरूणने बोलताच करणने मी आता रिलेशनशिपमध्ये नाही. माझे ब्रेकअप झाले आहे असे सांगितले. करण जोहरने दिलेल्या लक्षवेधी उत्तरानंतर वरुण हसत म्हणाला की, मला हाच खुलासा करायचा होता.
कॉफी विथ् करण या शोमध्ये करण जोहर अनेक अभिनेता- अभिनेत्याचे सीक्रेट्स बाहेर काढतो. शो मध्ये करणने असे काही प्रश्न विचारले आहेत ज्याने उपस्थितासह अनेकांच्या भुवय्या उचांवल्या आहेत.आता करण जोहरचं सत्य समोर आलं आहे. करण जोहर त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल अनेकदा बोलला आहे. मात्र पर्सनल लाईफबद्दल केव्हाही खुलेपणाने बोलताना दिसत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.