अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! 7 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त

सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुकेश चंद्रशेखर विरुद्ध खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का! 7 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त
जॅकलिन फर्नांडिसSaam Tv

सक्तवसुली संचालनालयाने (ED) सुकेश चंद्रशेखर विरुद्ध खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जॅकलीन फर्नांडिस यांच्या अंतर्गत 7.12 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा समावेश आहे. (Jacqueline Fernandez ED)

सुकेशने जॅकलिनला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. तर वृत्तानुसार, त्याने जॅकलिनच्या जवळच्या कुटुंबीयांना US डॉलर 173,000 आणि जवळपास 27,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा निधीही (Funds) दिला होता.

सुकेश सध्या पाच वर्षे जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेला आहे. 4 एप्रिल रोजी त्याला ईडीने या प्रकरणात अटक केली होती. तर, गेल्या वर्षी, गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.