
बॉलिवूड कलाकार आणि त्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बॉलिवूड कलाकार कुठे राहतात, ते त्यांच्या दिवस कसा स्पेंड करतात याविषयी जाणून घेण्याचे अनेकांना कुतूहल असते. जीवनात डोकावण्याची अनेकांची इच्छा असते.
आज आपण अशाच एका अभिनेत्रींच्या घरात डोकावणार आहोत. दोन दिग्गज कलाकारांच्या घरात जन्मलेल्या या अभिनेत्रीने नुकतीच तिच्या घराची झलक शेअर केली आहे. ही अभिनेत्री आहे ईशा देओल. ईशा देओलने तिच्या आलिशान घराची झलक शेअर केली आहे.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत ईशाने तिच्या घराची झलक दाखवली तसेच घरातील बारकाव्यांविषयी देखील सांगितले. व्हिडीओ सुरुवातीलाच ईशाने सांगितले की आमची दोन घरे आहेत. कधी आम्ही इथे असतो तर कधी इथे. आपण यशाच्या ज्या घराविषयी बोलत आहोत ते ईशाचे जुहू येथील घर आहे.
जुहू येथील या घरात ईशा, हेमा मालिनी, तसेच तिचे आजी-आजोबांसोबत राहायची. तिचे बालपण पूर्ण साऊथ इंडियन संस्कृतीत गेले. त्यांच्या रोज केळ्याच्या पानावर जेवायचे, डान्सचा सर्व व्हायचा. घरी नेहमीच डान्स शिकायला विद्यार्थी आलेलं असायचे.
ईशा देओलचा घरामध्ये हेमा मालिनी आणि धर्मेद्र यांचे बरेच फोटो आहेत. त्याच्या सोफ्यावरील ऊषा देखील कस्टमाईज केलेल्या आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ईशालाच्या आई - वडिलांचा वास आहे असे भासते.
तसेच यशाचा रिहर्सल हॉल त्याच्यासाठी खूप खास आहे. ऑरेंज आणि येलो रंगाच्या या हॉलमध्ये तुम्हाला कलेचं दर्शन होईल. या हॉलमध्ये कुटुंबीय त्यांच्यासह कोणालाही चप्पल घालून प्रवेश करू देत नाहीत. या हॉलमध्येच ईशाचा साखरपुडा आणि अनेक कार्यक्रम झाले आहेत.
याच बंगल्यात हेमा मालिनीचे ऑफिस देखील आहे. या ऑफिसमध्ये हेमा मालिनी यांचे विविध पुरस्कार ठेवलेले आहेत. ऑफिसमध्ये देखील हेमा मालिनी आणि धर्मेद्र यांचे फोटो आहेत.
उत्तम रंगसंगती, डिझाईनर वॉलपेपरचा वापर, हवेशीर खोल्या अशी एकंदरीत ईशाच्या घराची रचना आहे.
ईशा देओलच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेली शॉर्ट फिल्म 'एक दुआ'ला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (Latest Entertainment News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.