Ranu Mandal Biopic: राणू मंडल यांच्यावर बायोपिक येणार, इशिका डे साकारणार भुमिका
Ranu Mandal Biopic: राणू मंडल यांच्यावर बायोपिक येणार, इशिका डे साकारणार भुमिकाSaam Tv News

Ranu Mandal Biopic: राणू मंडल यांच्यावर बायोपिक येणार, इशिका डे साकारणार भुमिका

''मिस राणू मारिया'' असं त्या बायोपिकचं नाव असून ऋषिकेश मंडल हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर इशिका डे ही राणू मंडलची भुमिका साकारणार आहे.

२०१९ मध्ये पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर राणू मंडल यांनी लता मंगेशकर यांच एक प्यार का नगमा है हे गाणं गायलं होतं. कुणातरी त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या. मात्र त्यांचा हा स्टारडम जास्तकाळ टिकला नाही आणि त्या पुन्हा जुन्या आयुष्यात परतल्या. आता त्यांच्या या प्रवासावर बायोपिक येणार आहे. ''मिस राणू मारिया'' असं त्या बायोपिकचं नाव असून ऋषिकेश मंडल हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर इशिका डे ही राणू मंडलची भुमिका साकारणार आहे. (eshika dey will perform role of ranu mondal in miss ranu maria)

हे देखील पहा -

दिग्दर्शक ऋषिकेश मंडल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, राणू मंडल्या रोलसाठी मी अनेक अभिनेत्रींना विचारणा केली, पण कुणीही त्यासाठी उत्सुक नव्हते कारण राणू मंडलचा रोल करण्यात त्यांना कमीपणा वाटत होता. मात्र इशिका डे हिने या रोलसाठी पसंती दर्शवली आणि आता ती राणू मंडलची भुमिका साकारणार आहे. इशिकाने या आधी सॅक्रेड गेम्स या बेवसीरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम केलं आहे. याआधी हा रोल सुदिप्ता चक्रवर्ती हिला ऑफर करण्यात आला होता, मात्र अगोदरच्या प्रोजेक्ट्समुळे तिला तारखा देणं शक्य झालं नाही त्यामळे राणू मंडलचा रोल इशिका डे करणार हे निश्चित झालंय.

Ranu Mandal Biopic: राणू मंडल यांच्यावर बायोपिक येणार, इशिका डे साकारणार भुमिका
ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट

राणूू मंडल या २०१९ मध्ये रातोरात स्टार झाल्या होत्या. त्यामुळे बॉलिवुड सिंगर हिमेश रेशमीया याने त्यांना पहिलं गाणं दिलं. तेरी-मेरी कहानी हे राणू यांचं पहिलं गाणं ठरलं. त्यानंतर त्यांनी आणखी दोन गाणी गायली. सोबतच अनेक रिअॅलिटी शो आणि कार्यक्रमांमध्ये त्या दिसल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे त्या लाइमलाईटपासून दुर गेल्या. आता त्यांची आर्थिक परिस्थिती पुर्वीप्रमाणेच बिकट आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com