VIDEO: शहनाजचे 'लोग हमसे जलते हैं' गाणं ऐकून चाहत्यांना आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण; चाहते म्हणाले...

शहनाजने आपल्या गोड आवाजात 'लोग हमसे जलते हैं' हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासूनच चाहत्यांनी तिचे भरपूर कौतुक करण्यास सुरुवात केली.
shehnaaz gill
shehnaaz gillinstagram

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल(Shehnaaz Gill) सध्या सोशल मीडियावर तिचे गायन कौशल्य दाखवत आहे. शहनाज गिलने पुन्हा एकदा आपल्या दर्दी आवाजात 'लोग हमसे जलते हैं' हे गाणं गाऊन चाहत्यांना खूश केले आहे. शहनाजने सोशल मीडियावर (Social Media) हा गाण्याचा व्हिडीओ शेअर केल्यापासून चाहते गाण्याच्या बोलांवरून सिद्धार्थ शुक्लासाठी हे गाण गायल्याचे बोलत आहेत. शहनाजने आपल्या गोड आवाजात 'लोग हमसे जलते हैं' हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासूनच चाहत्यांनी तिचे भरपूर कौतुक करण्यास सुरुवात केली.

shehnaaz gill
Video: बॉयफ्रेंडच्या आठवणीत मलायकाचा 'गोरी है कलाइयां'वर जबरा डान्स, व्हिडीओ व्हायरल

'बिग बॉस १३' या शोच्या दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. 'बिग बॉस १३' च्या दरम्यान ही जोडी इतकी लोकप्रिय झाली की चाहत्यांनी या जोडीला 'सिडनाज' असे नाव दिले. मात्र गेल्या वर्षी सिद्धार्थच्या आकस्मिक निधनानंतर शहनाजवर दुःखाचा डोंगर कोसळला. सिद्धार्थला जगाचा निरोप घेऊन आता एक वर्ष होत आले, पण अजूनही शहनाज किंवा त्याचे चाहते सिद्धार्थला क्षणभरही विसरू शकले नाहीत.

shehnaaz gill
'द कपिल शर्मा शो' कृष्णा अभिषेकने सोडल्यानंतर सुनील पाल म्हणाला, 'आता 'बी' ग्रेड चित्रपट...'

दीर्घकाळ अस्वस्थ राहिल्यानंतर शहनाज गिलने तिच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही तिचे अनेक अपडेट्स पाहायला मिळतात. शहनाजने नुकताच 'कबीर सिंह' चित्रपटातील 'क्या हाल हो गया है' हे गाणं गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा 'लोग हमसे जलते हैं' हे गाणं गाऊन सिद्धार्थची आठवण काढताना दिसतेय. शहनाज 'लोग हमसे जलते हैं' हे गाणं गाताना खूपच निरागस दिसत आहे.

हे गाणं ऐकल्यानंतर चाहते शहनाजच्या गोड आवाजाचे कौतुक करत असतानाच भावूकही होत आहेत. चाहते कौतुक करत 'हाय मरजवां सना क्या आवाज है' असे कमेंटमध्ये लिहित आहेत.कमेंट करत कोणी शहनाजच्या आवाजाचे कौतुक करत आहेत. तर, कोणी तिला 'मल्टी टॅलेंटेड' म्हणत आहेत. शहनाजचे हे गाणे ऐकून अनेकांनी सिद्धार्थसोबतच्या तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com