Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: हातात हातकडी, नजरेत निराशा; नक्की कोणत्या गुन्ह्याची जेठालालला मिळते शिक्षा?

टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये नेहमी काही ना काही मजेदार घडामोडी घडतच असतात
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Update | मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध विनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )मध्ये नेहमी काही ना काही मजेदार घडामोडी घडतच असतात. यामुळे चाहतेही एपिसोड बघताना अगदी लोटपोट हसतात. आता देखील असंच काहीसं घडणार आहे. जेठालाल किती प्रामाणिक आहे हे सर्वांनाच माहीत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Ali Fazal-Richa Chadha Wedding : मिर्झापूर फेम गुड्डू भैया लवकरच लग्नबंधनात अडकणार

पण मग अशा जेठालालच्या हातात हातकड्या कशाला? जेठालाल(Dilip Joshi) मान वर करून नव्हे, तर मान खाली घालून निराशेने कोणत्या कारणासाठी उभा आहे? त्याने असा कोणता गुन्हा केला आहे की त्याला अशी शिक्षा मिळत आहे? सर्व गोकुळधामवासी यावेळी विचार करत आहेत की, नक्की जेठालालने असे काय केले की त्याला हातकड्या लावाव्या लागल्या.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Karan Mehra - Nisha Rawal: टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ; करण मेहराचे निशावर गंभीर आरोप, मानलेल्या भावासोबतच...

गोकुळधामवासीयांच्या छोट्याशा चुकीमुळे जेठालालवर मोठे संकट ओढवलं आहे, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पोपटलालने भिडेला सांभाळून ठेवण्यासाठी दिलेले दागिने ते एकेक करून संपूर्ण गोकुळधाम सोसायटीत फिरले आणि नंतर कुठेतरी गायब झाले. अखेर पोलिसांना दागिने शोधण्यासाठी बोलावण्यात आले आणि शेवटी पोलीस या निष्कर्षाप्रत आले की गोकुळधाममधील सर्व लोकांचा शोध घेतला जाईल आणि तसे झाले देखील. नंतर काय दागिनेही सापडले ते पण जेठालालच्या घरातून. त्यानंतर सर्वांसमोर चित्र स्पष्ट झाले आहे. यामागे जेठालालचा हात असल्याचे पोलिसांना समजले कारण पोपटलालचे दागिने जेठालालने कपाटात लपवून ठेवले होते.

बरं, आता जो कोणी ही चोरीची बातमी ऐकतोय त्याला यावर विश्वासच बसत नाही. जेठालाल दागिने चोरू शकतो यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. मात्र जेठालालच्या कपाटातून दागिने सापडले आहेत. अशा परिस्थितीत काहीतरी गडबड आहे आणि हा गोंधळ कसा झाला हे स्वत: जेठालालला समजत नाही. आता हे दागिने जेठालालनेच चोरले आहेत की प्रकरण वेगळे आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com