//Amazon Publisher's Services //End of Amazon Publisher's Services Code

Prasad Khandekar Bought New Home: ‘अजून एक स्वप्न पूर्ण…’ हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं घेतलं नवं घर; घराची नाही तर नेमप्लेटची चर्चा...

Prasad Khandekar New Home: कायमच आपल्या वैविध्यपुर्ण अभिनयासाठी चर्चेत राहणाऱ्या प्रसादने चाहत्यांसोबत नव्या घराची झलक शेअर केली आहे.
Prasad Khandekar Bought New Home
Prasad Khandekar Bought New HomeInstagram

Prasad Khandekar New Home Photos

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रसाद खांडेकर कायमच त्याच्या खास विनोदीशैलीमुळे चर्चेत असतो. कायमच आपल्या वैविध्यपुर्ण अभिनयासाठी चर्चेत राहणाऱ्या प्रसादची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. नुकतंच प्रसाद खांडेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत नव्या घराची झलक शेअर केली आहे. त्याच्या घराच्या पुजेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील काही कलाकारांसह त्याच्या परिवारातील सदस्यांनी पुजेला हजेरी लावली होती.

Prasad Khandekar Bought New Home
Adinath Kothare Video: जेनमाला फोन केल्यानंतर खूप रडला; आजीच्या आठवणीत आदिनाथ कोठारेला भावना अनावर

प्रसाद खांडेकरच्या पुजेला नम्रता संभेराव, गौरव मोरे या दोघांनीही हजेरी लावली होती. दोघांनीही सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. सोबतच यावेळी अभिनेत्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याच्या कुटुंबीयातील अनेक सदस्य सुद्धा उपस्थित होते. प्रसाद खांडेकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये, त्याची बायको, मुलगा, आई सह इतर कुटुंबीय दिसत आहेत. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून काही सेलिब्रिटी मित्रांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला.

Prasad Khandekar Bought New Home
HBD Atul Kulkarni: अभिनेता, लेखक आणि बरंच काही.. खऱ्या अर्थाने चतुरस्त्र कलाकार म्हणजे अतुल कुलकर्णी

प्रसाद खांडेकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “नवीन घर…अजून एक स्वप्न पूर्ण…घर शोधायला लागले १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला गेले २ महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!” असं कॅप्शन देत अभिनेत्याने आपल्या कुटुंबासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. प्रसादच्या घराची नेमप्लेट देखील खूपच खास आहे. त्याने त्याच्या घराची नेमप्लेट क्लॅपबोर्डवर बनवलेली आहे. त्याच्यावर त्याचं नाव असून त्यावर अनेक चित्रं रेखाटलेली दिसून येत आहेत. नेमकं प्रसादने हे नवं घर कुठे घेतलंय, याची माहिती मिळालेली नाही.

सध्या अनेक मराठी सेलिब्रिटी नवीन घर, नवीन कार खरेदी करत आहेत. प्राजक्ता माळी, राधा सागर, मीरा जोशी, प्राजक्ता गायकवाडनंतर प्रसाद खांडेकरने नवीन घर खरेदी केल्यामुळे त्याची तुफान चर्चा होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com