Raj of Raj-Koti Passes Away: प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकाराचे निधन; सिनेसृष्टीवर पसरली शोककळा....

साऊथ इंडस्ट्रितील संगीत दिग्दर्शक राज यांचे निधन झाले आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Raj of Raj-Koti Passes Away
Raj of Raj-Koti Passes AwaySaam Tv

Raj of Raj-Koti Passes Away: साऊथ इंडस्ट्रितील संगीत दिग्दर्शक राज यांचे निधन झाले आहे. रविवारी सायंकाळी ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगू सिनेसष्टीसाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. रविवारी २१ मे रोजी सायंकाळी हैदराबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टसने दिलेल्या माहितीनुसार, संगित दिग्दर्शक राज यांचे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले आहे. राहत्या घरी बाथरूममध्ये अचनाक कोसळून त्यांचे निधन झाले.

Raj of Raj-Koti Passes Away
Amruta Khanvilkar Emotional Post: तुम्ही हा पुरस्कार खूप खास बनवला... अमृताच्या गैरहजेरीत आई-बाबांनी स्वीकारला सन्मान, अभिनेत्रीची भावुक पोस्ट

प्रसिद्ध तेलुगू संगीतकार टीव्ही राजू यांचा तो मुलगा आहे. त्यांच्या सिनेकारकिर्दिबद्दल बोलायचे तर, राज आणि कोटी ही साऊथ सिनेसृष्टीतील एक नामवंत संगीतकार जोडी असून त्यांनी अनेक हिट चित्रपटांना आपला दमदार आवाज दिला आहे. साऊथ सिनेसृष्टीतील सध्याचे काही संगीतकार जसे, ए.आर. रहमानने टॉलीवूडमध्ये अनेक वर्षे कीबोर्ड प्लेयर/प्रोग्रामर म्हणून त्याच्या हाताखाली काम केले. राज आणि कोटी या जोडीने साऊथ सिनेसृष्टीला तब्बल १८० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते. आणि आजही ते गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत.

Raj of Raj-Koti Passes Away
Golmaal 5: गोलमालचा सिक्वेल कधी येणार? श्रेयसने दिली मोठी अपडेट; म्हणाला....

बालासुब्रमण्यम यांच्या कित्येक गाण्यांना त्यांनी संगीत दिले आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार मिळाला होता, ज्या चित्रपटात नागार्जुनने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यानंतर काही वर्षांनी राज आणि कोटी वेगळे झाले आणि स्वतंत्र काम करू लागले. त्यानंतर देखील या जोडीने प्रेक्षकांना उत्तम संगीत दिले. नुकत्याच एका मुलाखतीत या दोघांनी पुन्हा एकत्र येत असल्याची घोषणा केली. पण राज यांच्या अचानक एक्झिटने साऊथ सिनेसृष्टी पोरकी झाली आहे. (Tollywood)

राज यांचे खरे नाव थोटकुरा सोमराजू असे होते. पण त्यांना राज म्हणूनच सगळे ओळखायचे. त्यांचे वडील हे टीवी राजू हे प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार होते. राज निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com