लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटीव्ह

बॉलिवुडमधील प्रसिद्ध सिने दिग्दर्शक तथा नृत्य दिग्दर्शक फराह खानला कोरोनोची लागण झाली आहे. विशेष म्हणजे तिने लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटीव्ह
Saam Tv NewsInstagram/farahkhankunder

मुंबई: कोरोनाची लागण होऊ नये म्हणून लसीकरण केले जात आहे. अनेकांनी कोरोना लसीचे दोन डोस पुर्ण केले आहेत, मात्र असं असूनही बऱ्याच जणांना कोरोनाची लागण होतेय. बॉलिवुडमधील प्रसिद्ध सिने दिग्दर्शक तथा नृत्य दिग्दर्शक फराह खानला कोरोनोची लागण झाली आहे. विशेष म्हणजे तिने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र तरीही तिला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. (Farah Khan Covid positive even after taking two doses of vaccine)

हे देखील पहा -

फराह खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहीलं की, "मी काळा टिका लावला नाही त्यामुळे हे झालं याचं मला आश्चर्य वाटतंय. मी कोरोना लशीचे दोन डोस घेतले आहे. तसंच कोविड लशीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींच्याच जास्त संपर्कात होते. मात्र, तरीदेखील मी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सध्याच्या काळात मी ज्या व्यक्तींच्या संपर्कात आले आहे, त्यांना या पोस्टच्या माध्यमातून माहिती देत आहे. परंतु, ज्यांना कळवलं नाही त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्या. आशा आहे या लवकरच मी बरी होईन", असं फराहने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

Saam Tv News
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल

फराह खान आपल्या मिश्किल आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. सिनेमासोबतच तिने अनेक रिअॅलिटी शो मध्ये जज म्हणू काम केलं आहे. ती बिगबॉसची मोठी फॅन आहे. तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून तिचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com