कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल

कंगना विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल
कंगना रणौत विरोधात तक्रार दाखलSaam Tv

मुंबई - कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगनाने काही दिवसांपूर्वी 1947 मध्ये स्वातंत्र्य ही भीक मिळाली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने कृषी कायद्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद ओढून घेतला आहे. कंगना विरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

ही तक्रार सोशल मीडियावर शीख समुदाया विरोधात आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी दाखल करण्यात आली आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार, मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये कंगना विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाने शीख समुदायविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला तसेच जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे.

कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल
विनाेद तावडेंवर भाजपाने साेपवली माेठी जबाबदारी; चाैघांना संधी

शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक ही पोस्ट तयार करण्यात आली आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. त्यामुळे आम्ही विनंती करतो की कंगनाच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करुन घ्यावी. तसेच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे या व्यवस्थापन कमिटीने तक्रार दाखल करत म्हटले आहे. त्यांनी एफआयआर नोंदवण्यासाठी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 124A (देशद्रोह), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 505 (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारे विधान) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com