Mukesh Chhabra's Mother Passed Away: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या आईचे निधन

Filmmaker Mukesh Chhabra's Mother Death: कमला गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अॅडमिट होत्या.
Mukesh Chhabra Mother Passes Away
Mukesh Chhabra Mother Passes Away Instagram @castingchhabra

Filmmaker Mukesh Chhabra's Mother Passes Away: सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांची आई कमला छाब्रा यांचे निधन झाले आहेत. कमला गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अॅडमिट होत्या. मुकेश छाब्रा यांच्या आई आजारी असल्याची बातमी कळताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

दीपिका पदुकोण, नुपूर सेनन, फराह खान, सुनील ग्रोव्हर, विकास बहल यासारखे बॉलिवूड स्टार्स मित्र मुकेश छाब्राला त्याच्या कठीण काळात धीर देण्यासाठी रुग्णालयात गेले होते. कमला छाबरा यांच्या पार्थिवावर शुक्रवार, १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Mukesh Chhabra Mother Passes Away
Sherlyn Chopra FIR: धक्कादायक! अभिनेत्री शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप; फायनान्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा

रिपोर्ट्सनुसार, कमला छाबरा यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून गंभीर होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून कमला यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना शुद्धच नव्हती. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

मुकेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून या दु:खद बातमीची माहिती दिली. एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या या पोस्टवर आता इंडस्ट्रीतील सर्व सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत.

मुकेश छाब्रा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी वेबसीरीज आणि जाहिरातींव्यतिरिक्त 300 हून अधिक चित्रपटांमध्ये कास्टिंग केले आहे. सुशांत सिंग राजपूत, मृणाल ठाकूर, राजकुमार राव आणि फातिमा सना शेख यांच्या चित्रपट कारकिर्दीत मुकेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com