Hindi vs South Debate : बॉलिवूड कधीच संपणार नाही, रोहित शेट्टीचं मोठं विधान

हिंदीबाबत सुरु असलेल्या वादावर सिनेविश्वातून दिग्गज सेलिब्रिटीज प्रतिक्रिया देत आहेत.
Rohit Shetty
Rohit Shettysaam tv

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेवरुन (hindi language) वाद-विवाद सुरु आहे. साऊथ इंडस्ट्री आणि हिंदी भाषिकांमध्ये सुरु असलेली शाब्दीक चकमक काही केल्या कमी होताना दिसत नाहिये. त्यामुळे हिंदीबाबत सुरु असलेल्या वादावर सिनेविश्वातून दिग्गज सेलिब्रिटीज प्रतिक्रिया देत आहेत. आता बॉलिवूडचा (bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही (rohit shetty) यावर भाष्य केलं आहे. रोहित शेट्टी गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranvir singh) एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये रंगलेल्या वादावर रोहितला प्रश्न विचारण्यात आला होता.

Rohit Shetty
हार्दिक पांड्या होणार टीम इंडियाचा कर्णधार ? गावस्कर म्हणाले...

रोहित शेट्टीने केलं मोठं विधान

दिवसेंदिवस होणाऱ्या दाक्षिणात्य सिनेमांच्या लोकप्रियतेचा बॉलिवूडवर काहीच परिणाम होणार नाही. बॉलिवू़ड कधीच संपणार नाही. बॉलिवूडला संपवण्याचा ट्रेंड कधीच येणार नाही. ८० च्या दशकात जेव्हा व्हिसीआर आले होते. त्यावेळीही शिअटर बंद होणार आणि बॉलिवूड संपलं आहे, अशी चर्चा लोकांनी केली होती. त्यानंतर आता ओटीटी आल्यावरही बॉलिवूड संपणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण बॉलिवूड कधीच संपणार नाही, असा विश्वास रोहित शेट्टीने बॉलिवूडबाबत व्यक्त केला आहे.

सरुवातीपासूनच दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक

रोहित म्हणाला की, दाक्षिणात्य सिनेमांचे हिंदी रिमेक ६० च्या दशकापासून बनवले जात आहेत. दाक्षिणात्य सिनेमा हिंदी सिनेमांपेक्षा जास्त सुपरहीट होत आहेत, असं रोहितला विचारलं असता, यावर तो म्हणाला, जर तुम्ही इतिहास तपासला तर कळेल दाक्षिणात्य सिनेमा अचानकपणे आता आले नाहीत. ५० आणि ६० च्या दशकात आम्ही शशी कपूरचा सिनेमा प्यार 'प्यार किये जा' पाहिला होता. तो सिनेमा तमीळ सिनेमाचं हिंदी रिमेक होता.तसंच अभिनेते जितेंद्र यांचा हिम्मतवाला आणि मवाली सिनेमा दाक्षिणात्य सिनेमांचाच रिमेक होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com