Gadar To Re - Release : सनी देओल- अमिषा पटेल जोडी दिसणार एकत्र, २२ वर्षांनंतर 'गदर: एक प्रेम कथा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Sunny Deol Post: 'गदर' 22 वर्षांनंतर रिकॉल म्हणून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Gadar Ek Prem Katha To Re Released
Gadar Ek Prem Katha To Re ReleasedTwitter

Gadar Ek Prem Katha Will be Released In June: अमिषा पटेल आणि सनी देओल यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'गदर २' ची घोषणा झाल्यापासून चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अमिषा पटेल आणि सनी देओल 'गदर-2'मधून 22 वर्षांनंतर सकीना आणि ताराच्या भूमिकेत परतत आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर'ची कथा आजही लोकांच्या मनात ताजी आहे.

सकीनाला वाचवण्यासाठी तारा पाकिस्तानात जातो आणि तिथे धुमाकूळ घालतो. राजाच्या भरात तिथला पाण्याचा पंप जमिनीतून उपटून टाकतो. आजही चाहत्यांमध्ये त्याची चर्चा होते. अलीकडेच 'गदर-2' रिलीज होण्यापूर्वी निर्माते आणि स्टारकास्टने वेगळी रणनीती अवलंबली आहे.

'गदर' चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होणार आहे

गदर 2 हा अनिल शर्मा दिग्दर्शित पीरियड ड्रामा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे, परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्माते प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज देणार आहेत. खुद्द सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी ही माहिती सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

22 वर्षांनंतर सनी देओलचा चित्रपट 'गदर' पुन्हा एकदा थिएटरमध्ये येणार आहे. प्रेक्षक 'गदर 2'शी कनेक्ट होण्याआधी 'गदर' 22 वर्षांनंतर रिकॉल म्हणून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. इतकंच नाही तर 'गदर'चा ट्रेलर रीमास्टर करून 4K मध्ये रिलीज केला जाणार आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर चाहते सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सनी देओल त्याच्या इन्स्टाग्राम ही बातमी पोस्ट करत आनंद व्यक्त करत आहे. सनीने लिहिले आहे, 'तेच प्रेम, तिच कथा भक्त एक अनोखी भावना! #गदर ९ जून रोजी 4K आणि डॉल्बी अॅटमॉस साउंडमध्ये मर्यादित कालावधीसाठी मोठ्या पडद्यावर परतत आहे.

सनी देओलच्या या पोस्टने त्याच्या चाहते खूप खुश आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर 2' ची किती आतुरतेने वाट पाहत आहे. एका यूजरने कमेंट केली की, "आम्ही फक्त अमरीश पुरी सरांना गदर 2 मध्ये खूप मिस करू".

आणखी एका यूजरने लिहिले की, "बाप रे अखेर प्रतीक्षा संपणार आहे". दुसर्‍या युजरने लिहिले, "तुमचा बाप येत आहे. सनी देओलची पोस्ट पाहिल्यानंतर, चाहते त्यांच्या उत्साहाला आवर घालू शकले नाहीत आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत."

गदर 2 बद्दल बोलायचे झाले तर यावेळी तारा सिंग उर्फ ​​सनी देओल पत्नी सकीनासाठी नाही तर मुलासाठी लढताना दिसणार आहे. या चित्रपटात उत्कर्ष शर्मा सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com