
Lawrence Bishnoi Warns Salman Khan: सध्या तुरुंगात असणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला जेलमधून बिश्नोई समाजाची माफी मागावी अन्यथा पुढील होणारे परिणाम भोगण्यास तयार रहावे, अशी धमकी वजा इशारा त्याने दिला आहे. एका मुलाखतीत लॉरेन्सने अभिनेत्याला धमकी दिली आहे, 'उद्या किंवा नंतर त्याचा अहंकार संपणार आहे.' गेल्या वर्षी जूनमध्ये, मुंबई पोलिसांनी सलमान आणि त्याचे वडील-गीतकार सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती.
जेलमध्ये दिलेल्या या मुलाखतीत लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला आणखी एक मोठी धमकी दिली आहे. एबीपी न्यूजशी संवाद साधताना बिश्नोई म्हणाला की, काळवीट मारून सलमान खानने केवळ आपल्या समाजाचाच अपमान केला नाही तर त्याचा रागही ओढवला आहे, असेही तो म्हणाला आहे.
लॉरेन्स पुढे म्हणतो, “सलमानच्या विरोधात केस दाखल केली गेली होती,पण त्यानं तेव्हा देखील आमच्या समाजाची माफी मागितली नाही. जर त्यानं आता देखील माफी मागितली नाही तर मग परिणाम भोगायला त्यानं तयार रहावं. आणि जे काय करायचं आहे ते करण्यासाठी मी कोणा दुसऱ्याचा आधार घेणार नाही.”
सोबतच लॉरेन्स पुढे म्हणतो, “जंबेश्वरी मंदिरात जाऊन बिश्नोई समाजाची माफी मागावी लागेल, असेही लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला सांगितले. समाजाने माफ केल्यास मी माघार नक्की घेईल असं ही लॉरेन्स त्या मुलाखतीत म्हणाला आहे.”
पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचेही नाव समोर आले आहे. मात्र, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सलमान खानचे वडील सलीम खान यांना आपण नुकतेच कोणतेही धमकीचे पत्र पाठवले नसल्याचेही त्याने सांगितले. ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी चौकशी केली पण मी कोणतेही धमकीचे पत्र पाठवलेले नाही.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, सलमान खानला एक पत्र मिळाले होते. त्यात त्याचा शेवट सिद्धू मुसेवालासारखा होईल, असे म्हटले होते. यानंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. सोबतच त्याला शस्त्र वापरण्याचा परवाना दिला आहे. आपल्या सुरक्षेचा विचार करून सलमान खानने बुलेट प्रूफ वाहन खरेदी केले आहे. त्याचबरोबर त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.”
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.