Shah Rukh-Gauri Khan: गौरी खानने लग्नाच्या ३० वर्षांनंतर शाहरुख खानबद्दल केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'या सवयीमुळे...

गौरी खानने शोमध्ये शाहरुख खानबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
ShahRukh Khan and Gauri Khan
ShahRukh Khan and Gauri KhanSaamTv

मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानची(Shahrukh Khan) पत्नी गौरी(Gauri Khan) खान यावेळी करण जोहरच्या टॉक शो 'कॉफी विथ करण'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये दिसणार आहे. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे, त्यानंतर या एपिसोडची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण गौरी खानने शोमध्ये शाहरुख खानबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

ShahRukh Khan and Gauri Khan
Uunchai : अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या मैत्रीचे खास क्षण, 'ऊंचाई'चे दुसरे पोस्टर रिलीज

या चॅट शोमध्ये गौरी खानने सांगितले की, जेव्हा ते त्यांच्या घरी पार्टी करत असतात, तेव्हा तिचा सुपरस्टार पती शाहरुख खान नेहमी पाहुण्यांना त्यांच्या कारमध्ये पाठवतो. 'कॉफी विथ करण सीझन 7' च्या आगामी एपिसोडमध्ये, १७ वर्षांनंतर शोमध्ये सहभागी होणारी गौरी तिच्या मैत्रिणी महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत शोमध्ये दिसणार आहे.

ShahRukh Khan and Gauri Khan
परिणीती चोप्रा-आयुष्मान खुराना बॉक्स ऑफिसवर आमने-सामने, 'कोड नेम: तिरंगा' आणि 'डॉक्टर जी' होणार एकाच दिवशी रिलीज!

आगामी एपिसोडमध्ये, गौरीने सांगितले की घरातील पार्ट्यांमध्ये, एक दिलदार होस्ट म्हणून, तो नेहमी पाहुण्यांना त्याच्या कारमध्ये घरी पाठवतो. शाहरुखची ही 'खास' सवय कधीकधी कशी त्रासदायक ठरते हे गौरी खानने या एपिसोडमध्ये उघड केले आहे.

गौरी खान म्हणाली, "तो नेहमी पाहुण्यांना त्यांच्या कारमध्ये सोडतो. काहीवेळा मला असे वाटते की तो पार्ट्यांमध्ये सगळ्यात जास्त वेळ पाहुण्यांना घरी पाठवण्यात पाठवतो. मग पार्टीमधील लोक त्याला शोधू लागतात. यामुळे मला असे वाटते की आपण रस्त्यावर पार्टी करत आहोत. घराच्या आत नाही." 'कॉफी विथ करण'चा हा भाग डिस्ने प्लस हॉटस्टारवर दर शुक्रवारी प्रसारित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com