Koffee With Karan:आर्यन खानच्या अटकेबाबत गौरी खान पहिल्यांदाच इतकी स्पष्ट बोलली; म्हणाली, तो काळ...

कॉफी विथ करण आगामी एपिसोडमध्ये शाहरूख खानची पत्नी गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत सहभागी झाली आहे.
koffee with karan News
koffee with karan NewsInstagram @gaurikhan

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा (Karan Johar)लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 7'(Koffee With Karan) सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. कॉफी विथ करण हा रिअॅलिटी शो सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आहे. या शो च्या प्रत्येक सीझनमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. आतापर्यत शोमध्ये बॉलिवूडच्या एकाहून एक दिग्गज सेलिब्रिटींनी सामील होऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. आता या सीझनच्या आगामी एपिसोडमध्ये इंटिरियर डिझायनर आणि अभिनेता शाहरूख खानची पत्नी गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत सहभागी झाली आहे. यादरम्यान तीने ड्रग्ज प्रकरण मुलगा आर्यन खानबद्दल वक्तव्य केले आहे.

koffee with karan News
Prakash Raj: सिनेमात खलनायक; रियल लाईफमध्ये ठरला नायक, या गावाचा केला कायापालट

माहितीनुसार, गेल्या वर्षी आर्यन खानला मुंबई पोलिसांनी एका क्रूझ जहाजावर ड्रग्ज घेऊन जात असल्याप्रकरणी अटक केली होती. याचदरम्यान, आर्यन बराच काळ तुरुंगात होता आणि यानंतर आर्यन खानची जामिनावर सुटका झाली. नुकताच रिअॅलिटी शो कॉफी विथ करण या एपिसोडमध्ये गौरी खान मुलगा आर्यनच्या अटकेबद्दल कुटुबांने या प्रकरणादरम्यान कसा सामना केला? याबद्दल बोलली आहे.

आर्यनच्या अटकेवर बोलताना करण जोहर म्हणाला- 'फक्त व्यावसायिकच नाही तर वैयक्तिकरित्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ होता. यातून तुम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून खंबीरपणे बाहेर आला आहात, हे सोपे नव्हते. पण एक आई म्हणून मी तुला सगळ्यांपेक्षा जास्त ताकदीने बाहेर येताना पाहिले आहे. जेव्हा कुटुंबे अशा परिस्थितीतून जातात तेव्हा कठीण प्रसंगाचा हाताळण्या बद्दल तुझे काय म्हणणे आहे?' असा प्रश्न विचारला

koffee with karan News
Raju Shrivastav: आज पहिल्यांदाच तुम्ही... विनोदवीराच्या निधनानंतर कपिल शर्मा भावूक; पोस्ट व्हायरल

यावर गौरी खानने 'होय, एक कुटुंब म्हणून आम्ही यातून गेलो आहोत... मला वाटते एक आई म्हणून, पालक म्हणून, आम्ही जे काही अनुभवलो आहोत, त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण आज आम्ही जिथे एक कुटुंब म्हणून उभे आहोत, तिथे आम्ही म्हणू शकतो की आपण चांगल्या ठिकाणी आहोत. जिथे आम्हाला आपल्या सर्वांचे प्रेम मिळते आहे. आमच्या सर्व हितचिंतक, मित्र याचे प्रेम यासाठी मी खरंच धन्य मानते. या काळात ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी ऋणी आहे.'

Edited By- Manasvi Choudhary

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com