Gautami Patil: 'मी लावणी करतच नाही, माझे कार्यक्रम म्हणजे फक्त...' लावणीचा अपमान होतोय म्हणणाऱ्यांची गौतमीने केली बोलती बंद

एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी पाहायला मिळत असताना तिच्या लावणीमधून अश्लिलतेचा प्रसार होत असून लावणीकलेचा अपमान होत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.
Gautami Patil
Gautami PatilSaam Tv

Gautami Patil: लावणी कलावंत गौतमी पाटीलची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी पाहायला मिळत असताना तिच्या लावणीमधून अश्लिलतेचा प्रसार होत असून लावणीकलेचा अपमान होत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे, त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

मात्र नुकतीच गौतमी पाटीलने साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत या टिकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे, काय म्हणाली गौतमी पाटील, चला जाणून घेवू.

Gautami Patil
Gautami Patil Exclusive: माझ्या कार्यक्रमांवर बंदीची मागणी कशाला? टीकाकारांना गौतमीचं उत्तर

आपल्या दिलखेचक अदांनी गौतमी पाटीलने तरुणांना चांगलेच वेड लावले आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी पाहायला मिळते. एकीकडे तिच्या कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद पाहायला मिळत असताना, लावणी कलेचा अपमान होत असल्याची टिकाही तिच्यावर होताना दिसत आहे. या टिकेवर गौतमीने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तिने सांगितले की, "मी पहिल्यापासून माझे कार्यक्रम म्हणजे लावणी नसल्याचे सांगत आहे. माझे कार्यक्रम म्हणजे फक्त डीजे शो आहे, माझ्या कार्यक्रमांना लावणी म्हणता येणार नाही, मला लावणी जास्त जमत नाही," मी नव्याने लावणी शकत नाही.

Gautami Patil
Lokayukt Bill Pass: लोकायुक्त विधेयक विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत मंजूर; मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत, पण...

या मुलाखतीत गौतमीने अनेक प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरे दिली. ज्यामध्ये तिने नव्या वर्षात नवीन लावणी गाणे घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हे गाणे सर्वांनी नक्की बघा असे आवाहनही यावेळी केले. दरम्यान, गौतमी पाटील लवकरच घुंगरू या मराठी चित्रपटातही झळकणार आहे, याबद्दलची माहिती तिने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com