
Gautami Patil New Song: आपल्या लावणीनं आणि खास नृत्यशैलीनं आजच्या तरुण पिढीला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. अवघ्या महाराष्ट्रात लावणी सादर करत गौतमी सर्वांनाच अक्षरश: वेड लावले आहे. महाराष्ट्रात गौतमीचा चाहतावर्ग ही बराच मोठा आहे. गौतमीची क्रेझ फक्त आता महाराष्ट्रातच नाही तर इतर ठिकाणीही तिच्या गाण्यांची सर्वत्र चर्चा आहे. लवकरच गौतमी शिंदेशाही बाण्यावर ठेका धरत एक नवी लावणी सादर करणार असल्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
‘बिग बॉस मराठी ३’चा स्पर्धक, गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत गौतमीसोबत एक नवं गाणं करणार असल्याची माहिती दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने नव्या गाण्याची घोषणा केली आहे. उत्कर्षने शेअर केलेल्या पोस्टमध्ये गौतमी पाटील देखील दिसत आहे. उत्कर्ष पोस्टमध्ये म्हणतो, ‘अहो शेट लय दिसान झालीया भेट. या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणी नंतर यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी माझं नवं लिखाण, नवं संगीत नव्या गायिकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार... लवकरच...’
या पोस्टमध्ये उत्कर्षने त्याच्या आणि गौतमी पाटीलच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. लावणी सोबतच ती अभिनयातही माहिर आहे, यात शंका नाही. लवकरच गौतमी आपली ठसकेबाज लावणी शिंदेशाहीच्या आवाजात थिरकणार आहे. नक्कीच या नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ही गौतमी आपली हवा करणार यात शंका नाही. उत्कर्षच्या पोस्टनंतर सर्वांनाच त्यांच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे.
गौतमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकतेच तिचे ‘तेरा पता’ हे पंजाबी गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला अजूनही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोबतच गौतमी लवकरच 'घुंगरू' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यानंतर ती एका वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
Edited By: Chetan Bodke
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.