Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa: ढोल ताशाच्या गजरात शिव ठाकरेच्या घरी ‘वर्दीतल्या बाप्पा’चं आगमन, मिरवणूकीत मुंबई पोलिसांचा सहभाग

Shiv Thakare News: शिल्पा शेट्टीनंतर बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेने सुद्धा लाडक्या गणरायाचे मोठ्या थाटात स्वागत केले आहे.
Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa
Shiv Thakare Welcomes To Police Ganpati BappaSaam Tv

Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa

देशासह राज्यामध्ये गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार धुमधाम सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक मोठमोठ्या मंडळाच्या बाप्पांचे ढोलताशाच्या गजरात आगमन झाले आहे. सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी मंडळी देखील बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत.

अनेकांच्या घरी लाडक्या गणरायाचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले आहे. शिल्पा शेट्टीनंतर बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेने सुद्धा लाडक्या गणरायाचे मोठ्या थाटात स्वागत केले आहे.

Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa
Shraddha Kapoor Insta Story: मोहम्मद सिराजमुळे नाराज झाली श्रद्धा कपूर, इन्स्टा स्टोरी शेअर करत विचारला सवाल

शिव ठाकरे कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतंच त्याच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. शिवच्या घरी, पोलिसांच्या गणवेशातला गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. या माध्यमातून अभिनेत्याने मुंबई पोलिसांना ट्रिब्युट दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणपती बाप्पाचे घरी विराजमान होईपर्यंत आगमन सोहळ्यामध्ये ५० पोलिसांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पोलिसांनी ही आगमन सोहळ्याचा आनंद लुटला.

Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa
Deepika Padukone Start New Business: फक्त अभिनेत्रीच नाही तर बिझनेस वुमनही, दीपिका पदुकोणची नव्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट

सध्या शिवचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्याने दिवसरात्र सेवेमध्ये कार्यतत्पर राहणाऱ्या मुंबई पोलिसांना अनोखी मानवंदना दिली आहे. यावर्षी शिवने त्याच्या घरी, खाकी वर्दी परिधान केलेल्या बाप्पाचे आगमन झाले असून बाप्पाच्या हातात वायरलेस फोन देखील दिसतोय.

शिवच्या घरच्या बाप्पाची थीम ‘सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ’ अशी आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते शिवच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहे. यावेळी बाप्पाच्या आगमनाप्रसंगी ५० पोलिसांनीही डान्स करत आगमन सोहळ्याचा आनंद लुटला.

शिवच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना १९ सप्टेंबर रोजी होणार असून २८ सप्टेंबरला गणरायाचे विसर्जन होणार आहे. शिवच्या घरी १० दिवसांसाठी गणपती बाप्पा असतो. यावेळी त्याच्या घरी फक्त त्याचे कुटुंबीय नाही अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सण साजरा करण्यासाठी शिव ठाकरे खूप उत्सुक आहेत.

Shiv Thakare Welcomes To Police Ganpati Bappa
Shabana Azmi Birthday: विवाहित आणि दोन मुलांचे बाप असतानाही जावेद अख्तरांसोबत लग्न, शबाना आझमींची फिल्मी लव्हस्टोरी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com