Premiere of Ghar Banduk Biryani in Delhi: मराठी चित्रपटाचा प्रिमियर थेट दिल्लीच्या तख्तावर; दिल्लीतल्या मराठी प्रेक्षकांसाठी ‘घर बंदूक बिरयानी’चं स्पेशल स्क्रिनिंग

नुकताच ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या टीमने दिल्ली दौरा केला आहे.
Ghar Bandook Biryani Premiere At Delhi
Ghar Bandook Biryani Premiere At DelhiSaam Tv

Ghar Bandook Biryani Premiere At Delhi: हेमंत अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जरी दिलासादायक कमाई नसली केली, तरी नागराज आण्णांनी चित्रपटाची बरीच हवा केली आहे. महाराष्ट्रभरात चित्रपटाची टीम दौरे करत असताना, प्रेक्षकांनी दिलेले प्रेम पाहून सर्वच भारावले होते. नुकतेच चित्रपटाच्या टीमने दिल्ली दौरा केला आहे.

Ghar Bandook Biryani Premiere At Delhi
Mansi Naik New Home: दमलेल्या जीवासाठी विसाव्याचं... मानसीने खरेदी केलं नवं घर; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

चित्रपटाचा प्रिमियर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात सुरू असताना दिल्लीकरांनीही नुकताच मराठी चित्रपटाचा आनंद लुटला. ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या प्रिमियरला दिल्लीतील मराठी प्रेक्षकवर्ग उपस्थित होता. चित्रपटाच्या संपुर्ण टीमने दिल्लीतील मराठी प्रेक्षकांची सुद्धा भेट घेतली. दिल्लीत झालेल्या प्रिमियरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकार आणि झी स्टुडिओजचे काही सदस्य देखील उपस्थित होते. (Marathi Film)

Ghar Bandook Biryani Premiere At Delhi
Katrina Kaif Video: विकी कौशल-कतरीना कैफ प्रेग्नंट? ईद पार्टीत लपवत होती बेबी बंप

यावेळी कलाकारांसोबतच प्रेक्षक देखील फारच आनंदित होते. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर मराठी चित्रपट पाहायला मिळाल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला होता. यावेळी प्रेक्षकांनी सर्वच कलाकारांचे आणि त्यांनी केलेल्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले आहे. सोबतच प्रेक्षकांनी स्क्रिनिंग नंतर नागराज मंजुळे यांच्या लूकचे ही कौतुक केले. (Entertainment News)

नागराज मंजुळे यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रेक्षकांना एकापेक्षा एक दमदार हिट चित्रपट दिल्यानंतर लवकरच नागराज मंजुळेंचा ‘खाशाबा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1952 च्या उन्हाळी ऑलम्पिक मध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवणारे फ्री स्टाईल कुस्तीपटू खाशाबा दादा साहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

त्यांनी कोल्हापुरात ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका कार्यक्रमात ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com