Ghar Banduk Biryani Poster: 'आशेच्या भांगेची नशा भारी'; घर बंदूक बिरयानीचे नवे पोस्टर प्रदर्शित, या तारखेला सिनेमागृहात पाहता येणार

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे.
Ghar Bnaduk Biryani Poster
Ghar Bnaduk Biryani PosterInstagram/ @akashthosar

Ghar Banduk Biryani Poster: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे समीकरण नेहमीच मराठी सिनेसृष्टीला काहीतरी हटके देण्याचा प्रयत्न करतात. असाच एक जबरदस्त चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे सज्ज झाले आहेत.

Ghar Bnaduk Biryani Poster
Kangana Ranaut: नवाजची अवस्था पाहून कंगनाच्या डोळ्यात पाणी, त्याच्या पत्नीवर संतापत म्हणाली 'तमाशा बंद कर...'

काही महिन्यांपूर्वीच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे. यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

Ghar Bnaduk Biryani Poster
Shiv Thakare Parents Video: शिवच्या आई- वडिलांची लेकासाठी खास पोस्ट, अमरावतीतून चाहत्यांना व्हिडिओ शेअर करत केली विनंती

येत्या ७ एप्रिल रोजी ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी यापूर्वी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिरयानी’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com