'ग्रेट ग्रँड मस्ती' फेम अभिनेत्रीचा 'आप'मध्ये प्रवेश; पक्षात उत्साहाचं वातावरण

Actress Kangna Sharma joined Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
Haryanavi Actress Kangna Sharma joined Aam Aadmi Party at Party HQ
Haryanavi Actress Kangna Sharma joined Aam Aadmi Party at Party HQInstagram/@viralbhayani

नवी दिल्ली: एकेकाळी बॉलीवूड चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना शर्माने आता अभिनयाच्या दुनियेला सोडून राजकारण निवडण्याचे ठरवले आहे. बॉलीवूड अॅक्ट्रेस कंगना शर्माने (Kangna Sharma) आप म्हणजेच आम आदमी पार्टीमध्ये (Aam Aadmi Party) प्रवेश करत राजकारणात एन्ट्री केली आहे. तिचे फोटोज् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Photos) होत आहेत. (Great Grand Masti Fame and Haryanavi Actress Kangna Sharma joined Aam Aadmi Party at Party HQ)

हे देखील पाहा -

कंगणाची राजकारणात दमदार एन्ट्री

अभिनयाच्या दुनियेत आपला बोल्ड फॉर्म दाखवल्यानंतर आता कंगना शर्माने राजकारणात आपली नवी वाटचाल सुरू केली आहे. 'आप' पक्षाच्या वतीने एक ट्विटही करण्यात आले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका कंगना शर्मा खेमका हिने अरविंद केजरीवाल यांच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. 'आप' परिवार त्यांचे स्वागत करतो अंस ट्विट करत तिचं स्वागत करण्यात आलं आहे.

बोल्डनेसमुळे कंगणाची चर्चा

कंगना शर्मा ही हरियाणवी अभिनेत्री आहे. अभिनयापूर्वी ती मॉडेलिंग करायची आणि त्यानंतर तिने सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. कंगनाने 'ग्रेट ग्रँड मस्ती' (Great Grand Masti) या चित्रपटातून पदार्पण केलं होतं, पण हा चित्रपट पडद्यावर फार काही करु शकला नाही.

या चित्रपटानंतरही कंगनाने ज्या चित्रपटांमध्ये काम केलं ते चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे ती ओटीटीच्या दुनियेकडे वळली. कंगना शर्माने 'मोना होम डिलिव्हरी' नावाच्या वेब सीरिजमध्ये काम केले होते, ज्यामध्ये तिने हॉटसीन्सच्या सर्व मर्यादा ओलांडत चाहत्यांना घायाळ केलं होतं.

Haryanavi Actress Kangna Sharma joined Aam Aadmi Party at Party HQ
ऑफिस टीमशी मैत्री करुन, असे करा एकत्रित काम

कंगनाची कारकीर्द

कंगना शर्माने २०१२ मध्ये मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. कंगना शर्मा पंजाबी गायक हार्डी संधूचा 'यार नी मैला', पूजा सिंगचा 'परदें में फिर से', नछतर गिलचा 'जान लेन तक', जॉनी सेठचा 'ब्युटी ओव्हरलोड' आणि इक्काचा 'निंद्रा' यांसारख्या म्युझिक व्हिडिओंमध्ये तिने काम केलं आहे. २०१६ मध्ये, कंगना शर्माने 'ग्रेट ग्रँड मस्ती' या बॉलिवूड चित्रपटातील तिच्या हॉटनेसने आणि बोल्ड सीन्सने ती चर्चेत आली होती.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com