महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नका

महेश मांजरेकरांच्या"नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा" या चित्रपटामध्ये अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नका
Mahesh Manjrekar: हायकोर्टाचा मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नकाSaam Tv

मुंबई: महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) "नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा" या चित्रपटामध्ये अल्पवयीन (Minor) मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप (Allegations) करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना आता हायकोर्टाकडून (High Court) मोठा दिलासा मिळालेला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने मुंबई (Mumbai) पोलिसांना (police) दिले आहेत. "नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा" या चित्रपटात काही वादग्रस्त दृष्यांवरून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (police) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील पहा-

चित्रपटात (movie) लहान मुलांशी संबंधित काही आक्षेपार्ह दृश्यांवरून माहिम पोलीस स्टेशनमध्ये 'पोक्सो' आणि 'आयटी' कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आली होती. "नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा" या चित्रपटामध्ये किशोरवयीन मुलांच्या भविष्याची एक वेगळी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र, कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावामधील चाळींशी संबंधित आहे. किशोरवयीन मुलाचे नात्यात प्रौढ महिलेशी संबंध चित्रपटामध्ये दाखवण्यात आले होते. यावर गिरणगावात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटामुळे गिरणगाव आणि चाळीमधील मुलांविषयी दिशाभूल होत असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला होता.

Mahesh Manjrekar: हायकोर्टाचा मोठा दिलासा; पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नका
Big Breaking: युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

यामुळेच मुंबई पोलिसांनी महेश मांजरेकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर मुंबई सत्र न्यायालयात पोक्सो कोर्टाने चौकशी करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. या अगोदर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली होती. ज्यामध्ये अटकेची कारवाई करण्यापासून मुंबई पोलिसांना रोखण्यात आले होते, अशी मागणी मांजरेकर यांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारकने याला विरोध करण्यात आला होता. यामुळे हायकोर्टाने मांजरेकरांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत, सोमवारी नियमित खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश महेश मांजरेकरांना दिले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com