
Ritesh Deshmukh: रितेश देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्ये एक स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. रितेशने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपल्या उत्कृष्ट अभिनयाने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवले आहेत. रितेशने बऱ्याचदा कॉमेडी चित्रपटातच काम केले आहे. त्याची बॉलिवूडमध्ये कॉमेडी स्टार म्हणूनही ओळख प्रचलित होत आहे. पण या गोष्टी रितेशला कधीच खटकल्या नाहीत. तो नेहमीच त्याच्या आयुष्यात एक 'सुरक्षित व्यक्ती' म्हणून कायम राहिला आहे. रितेश त्याच्या चित्रपटांच्या निवडीबद्दल कधीच लाजत नाही.
सोबतच तो पुढे म्हणतो, "शेवटी, मला काय ऑफर केले जात आहे हे महत्त्वाचे आहे. भविष्यात माझी मुले याबद्दल काय विचार करतील याचा मी कधी विचार केला नाही. जेव्हा मी हे चित्रपट केले तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी स्वत: माझ्या करियरची निवड केली होती. माझ्या आई-वडिलांनी मला कधीच सांगितले नाही की काय करावे किंवा काय करू नये."
रितेशने आपल्या करिअरमध्ये 60 हून अधिक चित्रपट केले आहेत, मात्र त्याला कॉमेडी चित्रपटांमुळे विशेष ओळख प्राप्त झाली आहे. रितेशने मस्ती, ग्रँड मस्ती, क्या सुपर कूल हैं हम सारखे त्याने सेक्स कॉमेडी चित्रपटही केले आहेत.रितेश देशमुखने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, "मी एकमेव असा अभिनेता आहे ज्याने 4 ते 5 सेक्स कॉमेडी चित्रपट केले आहेत आणि मला यात कोणतीही लाज वाटत नाही."
रितेशने कधीही प्रकाशझोतात येण्यासाठी फार अट्टाहास केला नाही. रितेश अनेकदा मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही दिसला होता. रितेशने नुकतेच त्याच्या होम प्रोडक्शनच्या 'वेड'या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाही मुख्य भूमिकेत आहे. 'वेड' ३० डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.