Viral Video: WPL मध्ये पठानचा जलवा! महिला खेळाडूंचा 'झुमे जो पठान'वर जबरदस्त डान्स

महिला क्रिकेट खेळाडूंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
women cricketer viral dance video
women cricketer viral dance videoSaam TV

Women Cricketer's Hook Steps On Jhome Jo Pathan: वूमेन्स प्रीमिअर लीगची सध्या सर्वत्र चर्चा आहे. डब्ल्यूपीएलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांचाही डब्ल्यूपीएलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सामान्यांतून क्रिकेटचा थरार आणि रोमांच मिळत आहे. महिला खेळाडू जशा मैदानावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत, तसेच त्या मैदानाबाहेरून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

महिला क्रिकेट खेळाडूंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुजरात जायंट्स यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गुजरात जायंट्स संघातील खेळाडू हार्ले गाला आणि शबनम शकील शाहरुखच्या 'पठान' चित्रपटातील 'झूम जो पठान' या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

women cricketer viral dance video
Bharat Ganeshpure Mother Died: 'चला हवा येवू द्या' फेम अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक; कुटूंबियांनी घेतला 'हा' कौतुकास्पद निर्णय

बॉलिवूडच्या या सुपरहिट चित्रपटातील गाण्यावर हार्ले गाला आणि शबनम शकील यांनी केलेल्या डान्सची सर्वत्र चर्चा आहे. या दोघीही 'झूम जो पठान' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हार्ले आणि शबनमने या गाण्यातील हुक स्टेप सुंदर डान्स केला आहे.

गुजरात जायंट्सने त्यांच्या संघांच्या विजयानंतर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच व्हिडिओ शेअर कअर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'काल रात्रीच सामना जिंकल्यानंतरचा मूड.'

'पठान' चित्रपटातील या गाण्यावर अनेक कलाकारांनी व्हिडिओ बनवत रील शेअर केले आहेत. 'पठान'ची क्रेझ महिला क्रिकेट खेळाडूंमध्ये देखील दिसून आली. x`महिला खेळाडूंनी या गाण्यावर डान्स करत त्यांचा आनंद व्यक्त केला.

महिला प्रिमीयर लीगमध्ये ८ मार्चला आरसीबी आणि गुजरात जायंट्स या दोन संघांमध्ये लीगचा सहावा सामना झाला. या सामन्यात गुजरातने आरसीबी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करून ७ विकेट गमावत २०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीला ६ विकेट्स गमावून १९० धावांचे करता आल्या. त्यामुळे आरसीबीचा ११ धावांनी पराभव झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com