Hema Malini Viral Video: ...अन् अचानक ‘ड्रिम गर्ल’चा पाय घरसला, हेमा मालिनी यांचा Video होतोय व्हायरल

Hema Malini News: हेमा यांचा मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये अचानक त्यांचा पाय निसटला.
Hema Malini Viral Video
Hema Malini Viral VideoSaam Tv

People Are Shocked After Seeing The Viral Video

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) जरीही रुपेरी पडद्यावर सक्रीय नसल्या तरी सुद्धा त्यांची कायम सोशल मीडियावर (Social Media) चर्चा होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून हेमा मालिनी सिनेविश्वापासून दूर आहेत. सोशल मीडियावर आजही हेमा यांची प्रचंड मोठी फॅन फोलोविंग आहे. अशातच हेमा यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमातून बाहेर पडत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. सध्या हेमा यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Hema Malini Viral Video
Attack On Actor: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर फॅनचा हल्ला; VIDEO व्हायरल

हेमा मालिनी नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाल्या. यावेळी देखील नेहमीप्रमाणेच साडीमध्ये हेमा मालिनी यांचे सौंदर्य खुलून दिसत होते. आजही हेमा यांच्या सौंदर्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये हेमा यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्या बाहेर पडत असताना, अचानक त्यांचा पाय निसटला आणि त्यांचा तोल जाताना दिसत आहे. पण त्यांनी पटकन स्वत:चा तोल सावरला आहे. व्हिडीओ पापाराझी यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून ऊप्स मूमेंटपासून थोडक्यात हेमा मालिनी बचावल्या आहेत.

Hema Malini Viral Video
Jab We Meet 2: १६ वर्षांनंतर करीना कपूर आणि शाहिद कपूर पुन्हा एकत्र?, लवकरच येणार ‘जब वी मेट’चा सीक्वेल...

नेटकऱ्यांनी पापाराझींसह हेमा मालिनी यांच्या आजुबाजुला असणाऱ्या लोकांवरही टीका केली आहे. एक युजर म्हणतो, ‘आपण आपल्या दिग्गज कलाकारांना पडणे आणि धक्काबुक्की करणे टाळू शकत नाही का? हे अपमानास्पद वाटते.’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘कधी कधी आपला अचानक किंवा अनावधानाने पाय सटकण्याची शक्यता असते, कोणाचाही पाय सटकू शकतो. पापाराझी असे का करतात? लोकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा विविध व्हिडीओ किंवा रील्स बनवणे खूप वाईट आहे. प्रत्येक कलाकार हा देखील एक माणूस आहे, त्यांच्यासोबतही दुर्घटना घडू शकते.’

Hema Malini Viral Video
Shah Rukh Khan On Dunki: 'मेरी फिल्म आती है तब...' 'जवान'च्या पार्टीत शाहरूख खानने सांगितली 'डंकी'ची रिलीज डेट

मध्यंतरी, न्यूज १८ सोबत संवाद साधताना ईशा देओल म्हणाली होती की, हेमा मालिनी पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये डेब्यु करण्याची शक्यता आहे. आईला स्वतःला सिनेसृष्टीत डेब्यु करायचे आहे. सध्या तिच्या संपर्कात अनेक बॉलिवूडमधले निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. तिने अनेक चित्रपटाच्या स्टोरीही वाचल्या आहेत. पण आई सध्या काही चांगल्या भूमिका आणि स्क्रिप्टच्या शोधात आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 'शिमला मिर्ची' या चित्रपटामध्ये अखेरचे काम केले होते. शूटिंगनंतर तब्बल ५ वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Hema Malini Viral Video
Milind Gawali: ‘आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात...’ मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com