Hemangi Kavi Post: 'रजनीकांत माझे आदर्श...', 'जेलर' पाहिल्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीची खास पोस्ट

Superstar Rajinikanth: हेमांगी कवीने सुपरस्टार रजनीकांत यांचे कौतुक केले आहे.
Hemangi Kavi Share Post
Hemangi Kavi Share Post Instagram

Hemangi Kavi Share Post After watching Jailer:

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच तिची मते मांडत असते. तसेच तिचे अनुभव देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये हेमांगी कवीने सुपरस्टार रजनीकांत यांचे कौतुक केले आहे. तसेच हेमांगीने तिचे आणि राजनीकांत यांचे फोटो देखील पोस्ट केले आहेत.

Hemangi Kavi Share Post
Welcome 3 Teaser: अक्षय कुमारने स्वतःसह चाहत्यांना दिले खास गिफ्ट; 'वेलकम 3'चा टीझर केला शेअर

हेमांगी कवी पोस्ट

हेमांगी कवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'लूक्सच्या बाबतीत आपला आदर्श ठरलाय! बॉस !माईंड इट! ‘रजनीकांत’ फिल्म, स्किनव्यतिरिक्त ही व्यक्ती मेकअप आणि विगशिवाय बिनदिक्कत कुठेही फिरते.

ही मुभा फिमेल कलाकारांना नाही आणि समजा माझ्यासारखीने ती घ्यायची ठरवली मग ते स्क्रीन असो वा वैयक्तिक आयुष्य तर तिला सोशल मीडियावर “ही तर कचरेवाली, धुणी-भांडी करणारीच वाटते! कामवालीचेच रोल करते, ही कुठल्या अँगलने हिरोईन / अभिनेत्री वाटते, आता म्हातारी दिसायला लागली वगैरे वगैरे सुरू होतं.

Hemangi Kavi Share Post
Marathi Movie: शाळेतल्या प्रेमाची छोटुकली कहाणी; 'आत्मपॅम्फ्लेट'च टीझर प्रदर्शित

सुरवासुरवातीला या कमेंटने वाईट वाटायचं, मग या मेल- फिमेल कलाकारांच्या बाबतीतल्या फरकाबद्दल राग येऊ लागला. पण आता दिसण्यातल्या खरेपणाला ज्यादिवसापासून आपलं केलं ना त्या दिवसापासून कशाचंच काही वाटत नाही! आपण मेकअप केला तर सौंदर्याच्या मोजपट्टीत आपण छान, आकर्षक वगैरे दिसतो आणि नाही केला तरी ‘जसे आहोत तसे बेस्टच आहोत’ हे फिलिंग असतं!

हा फ्रीडम मी माझ्यापुरता तरी मिळवलाय! खरंच! मेकअप करणं हा माझ्या कामाचा भाग आहे, तो केल्याने मी सुंदर, छान, आकर्षक दिसण्यापेक्षाही मी निभावत असलेलं पात्र दिसणं जास्त गरजेचं असतं! मेकअप केल्याने कायापालट होतो. अभिनयात तेच महत्त्वाचं असतं! नाही का? पण काही लोकांना हे कळतंच नाही. द्वेषापोटी काही ही बोलत सुटतात! असो!

आज काय त्यांचा वाढदिवस वगैरे नाहीए. काल जेलर पाहिला आणि जाणवत राहीलं. हा माणूस प्रत्यक्षात किती वेगळा पण तोच पडद्यावर आल्यावर किती वेगळा! थँक्स तो सुपर डुपर स्टार रजनीकांत! तुम्ही माझ्यासारख्या अनेकांसाठी उदाहरण आणि प्रेरणा आहेत अनेक मार्गांनी!

हेमांगी कवी सध्या तिच्या 'जन्मवारी' या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त आहे. तिच्या या नाटकाचा प्रयोग रॉयल ऑपेरा हाऊस येथे झाला होता. या प्रयोगामुळे हेमांगी खूप आनंदी झाली होती. तिचे एक स्वप्न पूर्ण झाले होते. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com