Hemangi Kavi Video: 'जवान' पाहण्याची उत्सुकता, 'चलेया' गाणं लागताच थिएटरमध्ये थिरकली हेमांगी कवी

Hemangi Kavi Watch Jawan: अभिनेत्री हेमांगी कवी नुकतीच हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती.
Hemangi Kavi Insta Story
Hemangi Kavi Insta StorySaam TV

Hemangi Kavi Share Video:

शाहरुख खानचा जवान चित्रपट या महिन्याच्या ७ तारखेला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमाल प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांसह सेलिब्रिटी देखील चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत.

अभिनेत्री हेमांगी कवी नुकतीच हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती. अभिनेत्रीने हा चित्रपट खूप एन्जॉय केले असल्याचे दिसत आहे. हेमांगी 'जवान'मधील गाण्यावर थिरकताना दिसली.

Hemangi Kavi Insta Story
Ashish Vidyarthi On Trollers: 'हे खूप अनपेक्षित होतं..' आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या लग्नावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

हेमांगी कवीने तिच्या सोशल मीडियावर 'जवान'च्या गाण्यावर नाचताना व्हिडीओ शेअर केला आहे. 'चलेया' हे 'जवान' चित्रपटातील एक रोमँटिक गाणे आहे. या गाण्यावर हेमांगी कवी डान्स करत आहे. हा व्हिडीओ स्टोरीला शेअर करत हेमांगीने लिहिले आहे की, 'स्वतः थांबवू शकले नाही.' तसेच तिने शाहरूख खान, अॅटली आणि 'जवान'चे संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांना हा व्हिडीओ टॅग केले आहे.

यासह हेमांगी कवीने 'जवान' चित्रपटातील शाहरुख खानचा फोटो हार्ट इमोजीसह शेअर केला आहे. तसेच गिरीजा ओकचा 'जवान'मधील फोटो शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

'जवान' चित्रपटाविषयी

दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अॅटली यांनी 'जवान'चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतूपती, प्रियामनी, दीपिका पदुकोण, संजय दत्तसह अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच ७५ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर आता हा चित्रपट ७०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com