
Hera Pheri 3 On Sanjay Datta: गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरीच्या आगामी भागाचे अर्थात 'हेरा फेरी 3'चे बद्दल रोजच नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकतंच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच चित्रपटाचा नवीन प्रोमो प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी प्रेक्षकांना मनोरंजनाचा बुस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे, कारण की, यावेळी चित्रपटात नकारात्मक भूमिकेसाठी दिसणार असल्याचा दावा केला जात आहे.
'हेरा फेरी 3' बद्दल नवीन माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. यातही अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल प्रेक्षकांना कॉमेडीचा जबरदस्त डोस देताना दिसणार आहेत. त्याचवेळी आता याबाबत आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढणार आहे. या चित्रपटात संजय दत्तची एन्ट्री झाली असून तो नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे.
चित्रपटात संजय दत्तची भूमिका नकारात्मक भूमिका असण्याची शक्यता असणार आहे. यात संजय दत्त अंध व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या व्यक्तिरेखेत एक ट्विस्ट आहे. संजय दत्तच्या एंट्रीमुळे हा चित्रपट अधिक रंजक होणार आहे. श्याम, राजू आणि बाबूराव यांच्यासोबत संजय दत्त कोणत्या युक्त्या खेळतो हे पाहावे लागेल! गेल्या वर्षी संजय दत्त 'KGF 2' मध्ये रॉकी भाई समोर खलनायकाच्या दमदार फॉर्ममध्ये दिसला होता. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या चित्रपटातही त्याने कमाल केली होती. 'शमशेरा'ची जादू चालु शकली नसली तरी सर्वांनी संजय दत्तचे कौतुक केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे शूटिंग येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल. मुंबईशिवाय परदेशातही चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. अबू धाबी, दुबई आणि लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग करण्याची निर्मात्यांची योजना आहे. बाबू भैय्या, राजू आणि श्याम परदेशात जाऊन जागतिक स्तरावर हेरा फेरी करताना दिसणार असल्याची चित्रपटाची कथा लिहिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.