Aryan Khan : किंग खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा रडारवर; हिंदू महासंघाकडून कोर्टात याचिका, कारण ?

आर्यन खानच्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
aryan khan news
aryan khan news Saam Tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Aryan Khan News : प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आहे. आर्यन खानच्या क्रुझवरील अंमली पदार्थ प्रकरणी झालेल्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी तब्बल 36 पानांची कागदपत्रे कोर्टात दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक (पालघर) यांनी आज, सोमवारी पुण्यात दिली. (Latest Marathi News)

aryan khan news
Har Har Mahadev: ....अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान यास घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात क्रुझवर पकडले होते. त्याचप्रमाणे आर्यन खान याने गुन्हा मान्य असल्याचे तपास अधिकाऱ्यांना पुढे मान्य केले होते. त्या आधारावर सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता. मात्र, तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आर्यन खान सह त्याच्या सहकाऱ्यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत दोषारोपपत्रातून नावे वगळली, असा आरोप हिंदू महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही ते न्यायालयात केसच्या दरम्यान टिकणार की नाही ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र, आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले, असा आरोप हिंदू महासंघाने केला.

aryan khan news
Nashik News: नाशिकमध्ये 55 गावांनी टेन्शन वाढवलं; गुजरातमध्ये सामील होण्यासाठी थेट गुजरातच्या अधिकाऱ्यांची भेट

या संपूर्ण घटने विरोधात हिंदू महासंघाने १३ जुलै २०२२ रोजी कोर्टात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा किती गाफिल राहिल्या, त्यांनी कसे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केली, हे मुद्दे हिंदू महासंघाने उपस्थित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com