Hindustani Bhau oppose Pakistani Movie to release in India
Hindustani Bhau oppose Pakistani Movie to release in India Instagram @hindustanibhaukingsarkar

Hindustani Bhau: पाकिस्तानी चित्रपटावर हिंदुस्थानी भाऊ भडकला, म्हणाला...

हिंदुस्थानी भाऊंनी मनसेला पाठिंबा देत 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' चित्रपटाला विरोध केला आहे.

Hindustani Bhau On Pakistani Movie: पाकिस्तानी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता फवाद खान सध्या त्याचा चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १५ ऑक्टोबरला पाकिस्तानसह इतर अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तसेच हा चित्रपट भारतात सुद्धा प्रदर्शित होणार आहे अशी चर्चा आहे. हिंदुस्थानी भाऊ याने या चित्रपटाला विरोध करत भारतातील प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे.

'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' 23 डिसेंबरला भारतात रिलीज होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी याला विरोध केला होता. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. आता हिंदुस्थानी भाऊंनी मनसेला पाठिंबा देत चित्रपटाला विरोध केला आहे.

Hindustani Bhau oppose Pakistani Movie to release in India
Urfi Javed New Video : उर्फीला झालंय काय? 'कसला' व्हिडिओ केलाय शेअर, बघून डोकंच फिरेल...

'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' भारतातील प्रदर्शनावर हिंदुस्थानी भाऊ म्हणाला, "द लीजेंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी चित्रपट आहे, ज्यामध्ये संपूर्ण पाकिस्तानी कलाकारांनी काम केले आहे. आता येथे काही एजंट आहेत ज्यांना हा चित्रपट इथे प्रदर्शित करायचा आहे, या चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे आणि मी हिंदुस्थानी भाऊ मनसेच्या या विरोधाचे समर्थनात करत आहे. (Hindustani Bhau)

कोणीही हा चित्रपट कोणत्याही थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर ते थिएटर जबाबदार असेल. तुझा चित्रपट, तुझे सर्व तिकडे, इथे नाही, हा नवा हिंदुस्थान आहे." हिंदुस्थानी भाऊने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याची भूमिका मांडली आहे.

Hindustani Bhau Instagram Story
Hindustani Bhau Instagram StorySaam Tv

मनसे नेते अमेय खोपकर यांनी नुकतेच 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात ट्विट केले होते. त्यात त्यांनी लिहिले, "फवाद खानचे चाहते, देशद्रोही पाकिस्तानात जाऊन चित्रपट पाहू शकतात." (Movie)

जेव्हापासून 'द लिजेंड ऑफ मौला जट्ट' भारतात प्रदर्शित होणार झाल्याची बातमी समोर आली आहे, तेव्हापासून या चित्रपटाला विरोध होत आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार की नाही हे पाहावे लागेल. या चित्रपटात फवाद खानसोबत पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com