Costa Titch: हॉलिवूडवर शोककळा, रॅपर कोस्टा टिचचं २७व्या वर्षी निधन, गाणं गाताना स्टेजवरून कोसळला अन्...

दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच याचे निधन झाले आहे.
Costa Titch Dies
Costa Titch DiesSaam Tv

Costa Titch Dies: दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच याचे निधन झाले आहे. कोस्टा टिच शनिवारी म्हणजेच 11 मार्च रोजी जोहान्सबर्गमधील अल्ट्रा म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. वयाच्या २७व्या वर्षी लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान गाताना स्टेजवर पडला. कोस्टा टिचचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

Costa Titch Dies
Tiger 3: ५७ व्या वर्षी 'टायगर' दिसतोय २७ वर्षांचा तरुण, लूक पाहून चाहते भाईजानच्या प्रेमात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कोस्टा टिच स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. या दरम्यान तो दुसऱ्यांदा पडताना दिसत आहे. एकदा तो स्वतःला सांभाळतो पण काही वेळाने तो पुन्हा पडतो. रॅपरच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून ही बातमी समोर येताच, कोस्टा तीजच्या निधनाने सर्व कलाकार, संगीत उद्योग आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.

Costa Titch Dies
Snehlata Dixit: माधुरी दीक्षितचं मातृछत्र हरपलं, वयाच्या ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोस्टा टिचचं खरं नाव Costa Tsobanoglou आहे. नेलस्प्रुट येथे 1995 साली कोस्टाचा जन्म झाला होता. कोस्टाला त्याच्या 'एक्टिवेट' आणि Nkalakatha या दोन हिट गाण्यांसाठी सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. कोस्टाचं अचानक निधन झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर 'कोस्टा टिचच्या आत्माला शांती लाभो' अशा पोस्ट त्याचे चाहते करीत आहेत.

Costa Titch Dies
Madhuri Dixit: माधुरी दीक्षित आणि तिच्या आईने केलंय एकाच सिनेमात काम, तुम्हाला माहितीये का?

गेल्या वर्षी असाच प्रकार बॉलिवूडचा प्लेबॅक सिंगर KK सोबतही झाला होता. गेल्या वर्षी म्हणजेच मे 2022 मध्ये केकेचा कोलकातामध्ये एक शो सुरु होता. त्यावेळी कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. केकेचे संपूर्ण नाव कृष्ण कुमार कुन्नथ होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com