
Amit Shah News: दाक्षिणात्य चित्रपट 'कांतारा'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. या चित्रपटाला देशभरून प्रेम मिळाले. सामान्य जनतेनंतर आता राजकीय नेत्यांनाही 'कांतारा'ची भुरळ पडली आहे. भारतचे गृहमंत्री अमित शाह यांनी कांतारावर त्यांची प्रतिकिया दिली आहे.
अमित शाह यांनी कांतारा चित्रपट बघितल्याचे सांगितले. तसेच शाह म्हणले, 'कांतारा चित्रपट पाहिल्यानंतर मला दक्षिण कन्नड जिल्ह्यातील संस्कृती समजली.' नुकतेच शाहांनी निवडणूक प्रचारादम्यान भाषण करताना हे वक्तव्य केले.
कर्नाटकच्या 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमित शाह एका सभेला संबोधित करण्यासाठी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर येथे गेले होते. जिथे त्यांनी ऋषभ शेट्टी अभिनीत 'कंटारा' चित्रपटाचा उल्लेख केला.
अमित शाह म्हणाले, 'धार्मिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा दक्षिण कन्नड जिल्ह्यात आढळतात. मी नुकताच 'कंतारा' पाहिला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला कळले की या राज्याला अशी समृद्ध परंपरा आहे.'
'कंतारा' हा चित्रपट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. 2022 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्याचा समावेश आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि लेखनाचीही जबाबदारी ऋषभ शेट्टीने सांभाळली होती. या चित्रपटाने अनेक विक्रम करता बॉक्स ऑफिसवर जबरजस्त कलेक्शन केले. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली.
पुढच्या वर्षी 'कंतारा 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी 'कंतार 2' ची घोषणा केली आहे. तेव्हापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
ऋषभ शेट्टीनेही एका मुलाखतीदरम्यान 'या चित्रपटाचा प्रीक्वल बनवला जाईल' असे सांगितले आहे. पहिल्या भागापूर्वीची कथा 'कंतारा 2' मध्ये दाखवण्यात येणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.