Vikram Veda: ह्रतिक रोशन आणि सैफ अली खानच्या 'विक्रम वेधा' ची विश्ववारी; 'या' १०० देशांमध्ये चित्रपट होणार रिलीज

विक्रध वेधा चित्रपट जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे.
vikram vedha movie
vikram vedha moviesaam tv

मुंबई: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan)आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif ali Khan) बहुप्रतिक्षित 'विक्रम वेधा' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर सध्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर आणि चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार विक्रध वेधा जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे.

vikram vedha movie
Prajakta Mali : प्राजक्ता माळीची इच्छा हटके; मग काय चर्चा होणारच...व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमध्ये सध्या बॉयकॉट ट्रेंड घूमाकूळ घालत आहेत. या बॉयकॉट ट्रेंडचा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या चित्रपटावर देखील परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत दोन बड्या अभिनेत्यांचा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. आणि बॉलिवूडचे संपूर्ण लक्ष या चित्रपटाकडे लागले असताना सुप्रसिद्ध चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी एक माहिती दिली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जगभरातील एकूण १०० देशांमध्ये विक्रम वेधा प्रदर्शित होणार आहे. असे सांगितले आहे.

माध्यमाच्या माहितीनुसार, विक्रम वेधा (VikramVedha) जगभरातील उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रमुख देशांसह युरोपमधील २२ देशांमध्ये, आफ्रिकेतील २७ देश आणि जपान, रशिया यांसारख्या देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचपाश्वभूमीवर चित्रपटाच्या सुरक्षेसाठी मुख्य व्यवस्था करण्यात आली आहे.

vikram vedha movie
TMKOC Update : 'या' कारणामुळे 'तारक मेहता....'च्या लेखकाने संपवलं होतं आयुष्य

विक्रम वेधा हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. विक्रम वेधाची कथा पूर्णत: सस्पेन्स आहे. 'विक्रम वेधा' हे गुलशन कुमारच्या टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ तसेच वाय नॉट स्टुडिओ प्रॉडक्शनच्या बनर खाली तयार झालेला चित्रपट आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित, भूषण कुमार आणि एस शशिकांत निर्मित 'विक्रम वेधा' चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com