Hrithik Roshan Birthday: ऋतिकच्या घरी आला क्युट सदस्य, नाव ठेवलं 'मोगली'...

Happy Birthday Hrithik: ऋतिकने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला स्वतःलाच एक छानसं गिफ्ट (Self Gift) दिलं आहे.
Hrithik Roshan 48th Birthday
Hrithik Roshan 48th Birthday Instagram/@hrithikroshan

मुंबई: बॉलिवुडचा सुपरहिरो ऋतिक रोशन याचा आजचा ४८ वा वाढदिवस. सोशल मीडियावरुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आपल्या वाढदिवशी त्याला अनेक गिफ्ट्सही मिळतायत. पण, त्याला सर्वात जास्त आवडलेलं गिफ्ट त्याला कुणी दिलं असेल तर ते त्याने स्वतःनेच. ऐकुन नवल वाटेल पण, ऋतिकने (Hrithik Roshan) त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला स्वतःलाच एक छानसं गिफ्ट (Self Gift) दिलं आहे. त्याच्या घरी एक क्युट सदस्य आलाय, ऋतिकने त्या चिमुकल्या सदस्याचं नाव 'मोगली' (Mowgli) असं ठेवलंय. (Hrithik Roshan Birthday Special)

हे देखील पहा -

ऋतिकच्या घरी आलेला सदस्य मोगली हे त्याच्या पपी (Puppy) चं नाव असून हे पिल्लू त्याला रस्त्यावर एका कारखाली सापडलं होतं. हे पिल्लू त्याने दत्तक घेतलं आणि त्याचं नाव मोगली ठेवलं. मोगली ऋतिकसोबत खूप खेळतो, अगदी ऋतिकच्या जीममध्ये इकडून - तिकडे धावत पळत असतो. त्यामुळे ऋतिकने आपल्या वाढदिवशी स्वतःलाच एक छानसं गिफ्ट दिलं आहे, असंच म्हणावं लागेल. ऋतिक आता पन्नाशीकडे वाटचाल करत असून सध्या त्याचं वय ४८ इतकं आहे. पण हा फक्त आकडाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण कुठल्याच अँगलने तो ४८ वर्षांचा वाटत नाही. त्याची फिटनेस, त्याची एनर्जी आणि त्याच्या चेहऱ्यावरील तेज अशा सर्व गोष्टी त्याला तरुण बनवून ठेवतात.

सध्या तो त्याचा आगामी सिनेमा विक्रम वेधाचं शूट करतोय. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ मध्ये रिलीज होत असून अभिनेत्री राधिका आप्टे आणि सैफ अली खान हे मुख्या भुमिकेत असणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com