Sussanne-Arslan Wedding: हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी करणार दुसरं लग्न; कोण आहे तिचा लाइफ पार्टनर?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान घटस्फोट घेतल्यापासून अर्सलान गोनीसोबतच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत आहे.
Sussanne-Arslan Wedding Update
Sussanne-Arslan Wedding UpdateSaam Tv

Sussanne-Arslan Wedding Update News | मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान घटस्फोट घेतल्यापासून अर्सलान गोनीसोबतच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत आहे. सुजैन आणि अर्सलान अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. अलीकडेच हे कपल सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, आता या कपलशी संबंधित आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुजैन खान लवकरच अर्सलान गोनीसोबत लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत आहे.

Sussanne-Arslan Wedding Update
Star Kids : माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कोणत्या चित्रपटात मिळाली संधी?

रिपोर्टनुसार, आपल्याला पुढचं आयुष्य एकत्रित व्यतित करायचं आहे हे सुजैन (Sussanne Khan) आणि अर्सलानला चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांचा लग्नसोहळा अगदी साधेपणाने होईल. कोणताही गाजावाजा केला जाणार नाही, असे बोलले जात आहे.

Sussanne-Arslan Wedding Update
Video: ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच दिशा पटानी टायगर श्रॉफला म्हणाली, मला सुद्धा...

सुजैन आणि अर्सलानच्या लग्नापूर्वी अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची कथित गर्लफ्रेंड सबा आझाद यांच्याही लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. हृतिक रोशन लवकरच सबा आझादसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. मात्र, या कपलने लग्नाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे सुजैन ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. पण त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुजैन खान यांनी सन २००० मध्ये लग्न केले होते. हे कपल मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपलपैकी एक होते. मात्र, दोघांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. अवघ्या तेरा वर्षांच्या संसारानंतर म्हणजेच २०१३ मध्ये दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यानंतरही ते दोघेही मुले रेहान आणि हृदान यांचा सांभाळ करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com