War 2 Released Date Out: अखेर प्रतीक्षा संपली! हृतिक रोशनच्या वॉर 2 ची रिलीज डेट आली समोर

War 2 Update: 'वॉर 2'च्या रिलीज डेटशी संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
War 2 Update
War 2 UpdateSaam TV

Hrithik Roshan War 2 Released Date Out: हृतिक रोशनचा वॉर 2 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. वॉर 2 च्या माध्यमातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दरम्यान हृतिक आणि एनटीआर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. यावेळी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीकडे सोपवण्यात आली आहे. आता 'वॉर 2'च्या रिलीज डेटशी संबंधित महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

आतापर्यंत निर्मात्यांनी वॉर 2 ची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटाबद्दल हिंट दिली आहे. या दोन्ही स्टार्सनी ट्विटरवर वॉर 2 मध्ये एकत्र काम करणार असल्याची हिंट दिली आहे. (Latest Entertainment News)

War 2 Update
Keerthy Suresh On Wedding Rumours: अरे बापरे! कीर्ती सुरेश लवकरच करणार लग्न ? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

ज्युनियर एनटीआरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हृतिक रोशन म्हणाला की, 'रणांगण तुझी वाट पाहत आहे'. यावर प्रतिक्रिया देताना ज्युनियर एनटीआर म्हणाले की, लवकरच सेटवर जॉईन होईल. ट्विटवरील या संभाषणानंतर दोघांचे चाहते खूप खुश झाले आहेत.

चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल बोलायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, वॉर 2, 24 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. तर वॉर 2 मध्ये, NTR पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असेल. या चित्रपटात हृतिक आणि एनटीआर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचीही चर्चा आहे. दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

War 2 Update
Vikram Responds To Anurag Kashyap: 'केनेडी'वरून अनुराग कश्यप-चियान विक्रममध्ये ट्विटर वॉर; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

दिग्दर्शक अयान मुखर्जी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. 'वॉर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे नेतृत्व करणार नाहीत. सध्या सिद्धार्थ आनंद हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर या चित्रपटावर काम करत आहेत. यानंतर ते शाहरुख खान आणि सलमान खानचा पठान वर्सेस टायगरवर काम करतील.

वॉर 2 व्यतिरिक्त, हृतिक रोशन फायटरमध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण असेल. वॉर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हृतिकसोबत टायगर श्रॉफ देखील होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com