
OTT Released Of Vikram Vedha: हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट विक्रम वेधा ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
विक्रम वेधाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. जिओ सिनेमाने चित्रपटाच्या रिलीजविषयी माहिती दिली आहे. जिओच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर याची अपडेट शेअर करण्यात अआली आहे.
हा चित्रपट आज म्हणजे १२ मे रोजी रिलीज झाला आहे. विक्रम वेधा सबस्क्रिप्शनशिवाय पाहता येणार आहे म्हणजेच हा चित्रपट जिओ सिनेमावर विनामूल्य उपलब्ध आहे. (Latest Entertainment News)
विक्रम वेधचा ट्रेलर शेअर करताना जिओ सिनेमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आयपीएलमधील संघांच्या युद्धादरम्यान... आता विक्रम वेधाचे युद्ध पाहा. विक्रम वेधाचा वर्ल्ड वाईड डिजिटल प्रीमियर शुक्रवार, १२ मे रोजी जिओ सिनेमावर."
अभिनेता हृतिक रोशनने देखील ट्विटरवर ट्विट करत याची माहिती दिले आहे. हृतिकने ट्विटमध्ये लिहिले आहे, 'तुम्हा सर्वजण #VikramVedha पाहण्यासाठी खरोखर उत्सुक आहात! मी यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जो माझ्यासाठी थोडा त्रासदायक होता. ते मला जमलं की नाही मला माहित नाही, आता तुम्ही मला सांगा!
तसेच, तुम्ही डिजिटल प्रीमियर अगदी मोफत पाहू शकता! हे मला खूप छान आहे असे वाटते. जिओ सिनेमाने हा बदल घडवून खूप चांगलं काम केलं आहे.'
विक्रम वेधामध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खानसोबत राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गायत्री आणि पुष्कर या जोडीने केले आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
विक्रम वेधा हा त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपट देखील गायत्री आणि पुष्कर यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते.
विक्रम वेधाच्या कथेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट हृतिक रोशन (वेधा) आणि सैफ अली खान (विक्रम) यांच्याभोवती फिरतो. विक्रम हा प्रामाणिक पोलीस अधिकारी असला तरी त्याची टीम भ्रष्ट आहे. तर, वेधा हा सुप्रसिद्ध गुन्हेगार आहे. जेव्हा विक्रमची टीम वेधाच्या धाकट्या भावाला भेटते तेव्हा दोघांमधील वैर वैयक्तिक होते. या चित्रपटात अॅक्शनसोबतच सस्पेन्सही आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.