Hruta Durgule Romantic Post: मी अशीच कल्पना केली होती... पॅरिसमधील रोमँटिक फोटो शेअर करत हृताला पतीने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

Hruta Durgule 1st Wedding Anniversary Post: गेल्या वर्षी हृताने प्रतीक शाहशी लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
Hruta Durgule 1st Wedding Anniversary Post
Hruta Durgule 1st Wedding Anniversary PostInstagram hruta12

Hruta Durgule Prateek Shah Romantic Photo: फुलपाखरू या मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे महाराष्ट्राची क्रॅश ओळखली जाते. महाराष्ट्राची क्रॅश असलेल्या हृताचा जीव कोणावर जडला असेल असं प्रश्न नेहमी प्रेक्षकांना पडायचा. या प्रश्नच प्रेक्षकांना गेल्या वर्षी उत्तर मिळालं. गेल्या वर्षी हृताने प्रतीक शाहशी लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.

हृताचा नवरा प्रतीकने तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. प्रतीकने हृतासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे, 'लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! नेमकी अशीच कल्पना केली होती!! (Latest Entertainment News)

Hruta Durgule 1st Wedding Anniversary Post
Aai Kuthe Kay Karte Serial Update: अरुंधतीचा वीणाला सल्ला, पण अनिरुद्धचा झाला संताप

पॅरिसच्या सुंदर रस्त्यावर लॉंग वॉक… कॅफेमध्ये हसणे आणि एकत्र वेळ घालवणे आणि शहराच्या शानतेत स्वतःला मग्न करणे !! मोठा दिवस आणि कुडकुडणाऱ्या रात्रीचा आनंद घेणे. एक वर्ष झाले आहे आणि अजून बरीच गरज वर्ष एकमेकांची साथ द्यायची आहे.'

प्रतीकने त्याचे आणि हृताचे पॅरिसमधील फोटो या पोस्ट मध्ये शेअर केले आहेत. पॅरिस हे शहर प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील आयफिल टॉवर जवळ हृता-प्रतीकने फोटो काढले आहेत. आयफिल टॉवरला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. अशा गोड गुलाबी वातावरणात दोघांचे रोमँटिक फोटो प्रतीकने शेअर केले आहेत.

हृताने देखील प्रतीकला लग्नच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृताने दोघांच्या रोमँटिक फोटोंचा व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हॅपी अनिव्हर्सरी मिस्टर शाह, तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस त्यासाठी मी स्वतःला खूप ग्रेटफूल मानते.'

हृताच्या या पोस्टवर प्रार्थना बेहरे, अजिंक्य राऊत, शब्बीर अलुवाहियासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी लग्नच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com