
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) म्हणजे फुलपाखरू या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी वैदेही लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राची क्रश असलेली ही अभिनेत्री सध्या बरीच चर्चेत आहे.
आधी लग्न, त्याचबरोबर सोशल मीडियावर २.५ मिलियन फॉलोअर्स आणि त्यानंतर लागोपाठ झालेल्या (movies) चित्रपटांच्या घोषणा यामुळे हृता दुर्गुळे सध्या प्रचंड आनंदात आहे. आता तिच्या आनंदात भर पडणारी अजून एक आनंदाची बातमी आपल्यासमोर आली आहे.
हृता दुर्गुळे जेवढी तिच्या क्युटनेसमुळे प्रसिद्ध आहे, तेवढीच ती तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांची चाहती झाली आहे. महाराष्ट्राची क्रश असणाऱ्या हृता दुर्गुळेचा नवीन चित्रपट 'अनन्या' (ananya) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे. चित्रपटाची पहिली झलक समोर आली असून, या चित्रपटाच्या टीजरची जोरदार चर्चा होत आहे.
'अनन्या' हा अत्यंत वेगळ्या विषयाचा हा असणारा चित्रपट आहे. हा चित्रपट २२ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ही अनन्या देशमुख नक्की कोण आहे? तिची गोष्ट नक्की काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पण या चित्रपटाचा हा हॅपनिंग टीजर प्रेक्षकांना फारच आवडतो आहे. स्वतःच्या स्वप्नाचा माग घेणारी अनन्याची कहाणी कशी उलघडत जाते. हे या टीजरमधून दाखवलं आहे. या टीजरमध्ये हृताचा आवाज आणि पुसटशी ओळख दाखवलेली आहे. मात्र या नव्या आणि गोड टीजरने अनन्याच्या आयुष्यात नेमकं काय घडणार ही उत्सुकता ताणली गेली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रताप फडने केले असून, अनन्या या नाटकाचे चित्रपटात रुपांतर करण्यात आले आहे. या चित्रपटात हृता दुर्गुळेसोबत सुव्रत जोशी, चेतन चिटणीस, रुचा आपटे, योगेश सोमण हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका सकारात आहेत.
हृता एकाच वेळी सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये दिसत आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकामधील मन्या, 'मन उडू उडू झालं' मालिकेतील दीपू तर, आता 'अनन्या' चित्रपटातील अनन्या देशमुख, अशा अनेक भूमिकांमधून ती आपल्या भेटीला येत आहे. या वेगळ्या भूमिकेचं आणि हृताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. हृता येत्या काळात 'टाईमपास ३' चित्रपटात सुद्धा एका डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.