Breaking News : हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान, अक्षयसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल

नोव्हेंबर २०१९ मध्ये हैद्राबादसह संपूर्ण देश एका धक्कादायक घटनेने हादरून गेला होता. पशुवैद्यक असणाऱ्या एका २६ वर्षीय युवतीचा चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. सदर घटनेने संपूर्ण देश हळहळला होता.
Breaking News : हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान, अक्षयसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल
Breaking News : हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान, अक्षयसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल SaamTv

नोव्हेंबर २०१९ मध्ये हैद्राबादसह संपूर्ण देश एका धक्कादायक घटनेने हादरून गेला होता. पशुवैद्यक असणाऱ्या एका २६ वर्षीय युवतीचा चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. सदर घटनेने संपूर्ण देश हळहळला होता.

हे देखील पहा :

या घटनेवरून आरोपींना कठोर शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी संपूर्ण देशवासीयांनी केली होती. देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड, टॉलिवूडसह संपूर्ण सिनेसृष्टीने शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली होती.

Breaking News : हैद्राबाद बलात्कार प्रकरण; सलमान, अक्षयसह ३८ कलाकारांवर गुन्हा दाखल
राज्यातील MHT CET परीक्षेच्या तारखा जाहीर; 'या' कालावधीत होणार परीक्षा

मात्र, पीडितेबद्दल शोक व्यक्त करताना काही सेलिब्रिटींनी पीडित मुलीची ओळख उघड केली होती. बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याच आधारावर सलमान खान (Salman Khan), अजय देवगण (Ajay Devgan), अक्षय कुमार (Akshay Kumar), रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) अनुपम खेर (Anupam Kher), फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांच्यासह बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 38 भारतीय सेलिब्रिटींवर बलात्कार पीडितेची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी दिल्लीतील सबजी मंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तसेच सदर प्रकरणात तीस हजारी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, याचिकेत तक्रारदार वकील गौरव गुलाटी यांनी म्हटलं आहे की, सामान्यांसाठी उदाहरण बनण्याऐवजी भारतीय सेलिब्रिटींनी नैतिक मूल्यांची जाणीव न ठेवता त्यांनी पीडितेची ओळख उघड केली आहे. संबंधित सर्व सेलिब्रिटींना ताबडतोब अटक करण्यात यावी ,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण,अनुपम खेर, फरहान अख्तर सह 38 कलाकारांवर अटकेती टांगती तलवार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com