बॉलिवूडची 'सुंदरी' ४६ व्या वर्षीही आहे सिंगल, ३ वेळा लग्न ढकललं पुढे; त्यामागचं गुपित उलगडलं

ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये सुष्मिता सेनने लग्न, मुले आणि नातेसंबंधांवर चर्चा केली. तिने आपल्या लग्नाविषयी अशी गुपिते उघडली, ज्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल.
Sushmita sen Image
Sushmita sen ImageSaam Tv

मुंबई : विश्वसुंदरीचा(Miss Universe) मान मिळवणारी अभिनेत्री (Sushmita Sen) सुष्मिता सेनबाबत वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक हिट चित्रपट देणारी सुष्मिता सिंगल मदर आहे. सुष्मिता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. पण वयाच्या ४६ व्या वर्षीही ती सिंगलच आहे. अलीकडेच ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये तिने तिच्या लग्नाविषयीचे गुपित उलगडलं आहे. जे क्वचितच कोणाला माहिती असेल.

Sushmita sen Image
'गुड न्यूज'नंतर आलिया भट्टचे नवे फोटो; नो-मेकअप लूकमध्ये दिसतेय 'लय भारी'

ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये सुष्मिता सेनने लग्न, मुले आणि नातेसंबंधांवर बरीच चर्चा केली. ट्विंकलने सुष्मिताला विचारले की, ती तिच्या नात्याबद्दल स्पष्टपणे कशी सांगू शकते? ते देखील अशा वेळी जेव्हा इंडस्ट्रीतील पुरुष आपण सिंगल असल्याचे खोटं भासवतात.

Sushmita sen Image
अंकिता लोखंडे डीप नेक ड्रेसमुळं ट्रोल; यूजर्स म्हणाले 'आता राखीही सुधारली आहे!'

'स्वतःला गमावून बसलो तर काय मिळवलं'

या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना सुश्मिता सेन म्हणाली, 'मी स्वतःला गमावून बसलो तर मग काय मिळवलं' या वक्तव्यावर माझा विश्वास आहे. मला फक्त प्रामाणिक राहायचे आहे. मी फक्त माझ्या मनाचे ऐकते. मग ती प्लास्टिक सर्जरी असो, माझे नातेसंबंध असो, विवाहित पुरुष असो किंवा अन्य कोणता विषय असो'.

जेव्हा ट्विंकलने सुष्मिताला विचारले की, ती सिंगल मदर असल्यामुळे लग्न करणे कठीण होते का, तेव्हा तिने सांगितले की, 'जेव्हा मी रेनीला दत्तक घेतलं तेव्हा माझ्या आयुष्यात एकही व्यक्ती नव्हती. यानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांना माझे प्राधान्य कळू शकले नाही. बरं, माझी जबाबदारी कुणी वाटून घ्यावी अशी माझी अपेक्षाही नाही. पण तुम्ही मला त्यापासून दूर राहायला सांगू शकत नाही. माझ्या मुलींना त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहीपर्यंत माझी गरज आहे. सुदैवाने मला माझ्या आयुष्यात खूप छान लोक भेटले. मी कधीच लग्न केले नाही याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या आयुष्यात येणारे पुरुष माझ्या मुलींमुळे निराश झाले होते. माझ्या मुलांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता.

लग्न तीन वेळा पुढे ढकलले...

सुश्मिता सेन पुढे म्हणाली की, माझ्या मुली मला कधीच अडचणीच्या ठरल्या नाहीत. माझे तीनदा लग्न होता-होता राहिले, पण देवाने मला नेहमी वाचवले. असं काय झाल ज्याने माझं लग्न मोडलं हे मी सांगू शकत नाही. पण मी एवढेच म्हणू शकते की देवाने मला आणि माझ्या मुलींना वाचवले. माझ्यावर वाईट वेळ यावी हे देवालाही बघायचे नव्हते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com