Celebs Kids Name 2022: आलियापासून ते सोनमपर्यंत, या सेलिब्रिटींच्या मुलांची नावं आहेत 'युनिक'; जाणून घ्या...

Bollywood Kids Name: या सेलिब्रिटींनी नाव जेवढी खास आहेत तेवढीच खास आणि युनिक नावं त्यांनी आपल्या मुलांनाही दिली आहे.
Bollywood Kids Name
Bollywood Kids NameSaam TV
Published on
𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵
𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵Instagram/@yuvisofficial

Cebrities Kids Name 2022: सेलिब्रिटी मंडळी आपलं वेगळेपण दाखवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मग ते काम असो किंवा नाव. त्यात बॉलीवूड सेलिब्रिटी तर आघाडीवरच आहेत. या सेलिब्रिटींनी नावं (Names) जेवढी खास आहेत तेवढीच खास आणि युनिक नावं त्यांनी आपल्या मुलांनाही दिली आहे. नुकतीच आई झालेल्या आलिया भट्टपासून ते सोनम कपूरपर्यंत यांनी आपल्या मुलांची खूपच सुंदर अशी नावं ठेवली आहेत. तर आज आपण काही खास सेलिब्रिटींच्या मुलांची युनिक नावं आणि त्या नावांचा अर्थ जाणून घेणार आहोत. (Bollywood Kids News)

Raha Ranbir Kapoor
Raha Ranbir KapoorInstagram/@aliaabhatt

आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं ठेवलं आहे. हे नाव आजी नीतू कपूर यांनी दिलं आहे. राहा म्हणजे (Divine Path) म्हणजे दिव्य मार्ग. तर संस्कृतमध्ये याचा अर्थ गोत्र असा होतो. आलियाच्या मुलीचं नाव लोकांना पसंत आहे. (Raha Ranbir Kapoor)

Vayu Kapoor Ahuja
Vayu Kapoor AhujaInstagram/sonamkapoor

सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे देखील यावर्षी पालक बनले आहेत. सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोनम कपूरच्या मुलाचे नाव वायु कपूर-आहुजा आहे. वायु म्हणजे वारा किंवा समीर. हे नावही युनिक आहे. (Vayu Kapoor)

Malti Marie Chopra Jonas
Malti Marie Chopra JonasInstagram/@priyankachopra

या वर्षी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे देखील पालक बनले आहेत. प्रियांकाने सरोगसीद्वारे सुंदर मुलीला जन्म दिला आहे. प्रियांकाच्या मुलीचे नाव मालती आहे. म्हणजे फुलांचा सुगंध. याशिवाय 'चांदणे', 'जस्मिन फूल' आणि 'मूनलाइट' असाही या नावाचा अर्थ आहे. (Malti Marie Chopra Jonas)

Devi Karan Singh Grover
Devi Karan Singh GroverInstagram/@bipashabasu

यावर्षी बिपाशानेही एका मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण यांनी आपल्या मुलीचे नाव देवी ठेवले आहे. ज्याचा अर्थ डिवाइन, दैवीय किंवा दैवी असा होतो. आईच्या आशीर्वादामुळे हा आनंद मिळाल्याचे बिपाशाने सांगितले. म्हणूनच मुलीचे नाव तिच्या नावावर ठेवले आहे. (Devi Karan Singh Grover)

𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵
𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵Instagram/@yuvisofficial

क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल हे देखील यावर्षी आई-वडील झाले आहेत. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ओरियन कीच सिंग ठेवले आहे. हे खूप वेगळे नाव आहे. ओरियन नक्षत्रातील एक तारा आहे. हे नाव युवराजला आवडले होते. (𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com