Pippa Teaser: भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'पिप्पा'चा दमदार टीझर प्रदर्शित

स्वातंत्र्यदिनाच्या या खास प्रसंगी ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्या 'पिप्पा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Ishan Khattar
Ishan KhattarSaam Tv

Pippa Teaser - स्वातंत्र्य दिनाच्या या खास प्रसंगी, इशान खट्टर (Ishaan Khattar) आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांच्या 'पिप्पा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पिप्पाच्या टीझरबद्दल सांगायचे तर 1 मिनिट 07 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 3 डिसेंबर 1971 रोजी देशाच्या सैनिकांसह संपूर्ण देश रेडिओवर इंदिरा गांधींना ऐकत असल्याचे दाखवण्यात आले आहे. 'काही तासांपूर्वी पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ला केला. मी, इंदिरा गांधी, भारताच्या पंतप्रधान, पाकिस्तानशी युद्धाची घोषणा करते. जय हिंद', असे शब्द कानावर पडताच धडाकेबाज अॉक्शनला सुरुवात होताना दिसत आहे.

हा चित्रपट ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा रविंदर रंधावा, तन्मय मोहन आणि मेनन यांनी लिहिली असून चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. चित्रपटाचं संगीत ए. आर रहमान यांनी दिलं आहे.

Ishan Khattar
घरकुल मिळत नसल्याने महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; यवतमाळ जिल्‍हाधिकारी कार्यालयातील प्रकार

'पिप्पा' चित्रपटाची रिलीज डेट

यादरम्यान टीझर व्हिडिओमध्ये मृणाल ठाकूर आणि इशान खट्टरची झलक देखील पाहायला मित्तल आहे. झरमध्ये ईशान युद्धभूमीवर दिसत आहे. या टीझरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ईशान खट्टरचा 'पिप्पा' चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com