Urfi Javed Hospitalised : उर्फी जावेद तापाने फणफणली; तिला नेमकं झालंय काय? आली मोठी अपडेट

फॅशनिस्टा उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग सेन्स अणि हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. उर्फीने तिच्या अंतरंगी स्टाइलने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Urfi Javed
Urfi Javed Saam Tv

Urfi Javed Hospitalised |मुंबई : फॅशनिस्टा उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या ड्रेसिंग सेन्स अणि हटके स्टाईलमुळे कायम चर्चेत असते. उर्फीने तिच्या अंतरंगी स्टाइलने(Social media) सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडेच उर्फीच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढवला आहे. परंतु सध्या उर्फी जावेदला रूग्णालयात दाखल केले असल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्टरनुसार, उर्फी जावेद काही दिवसांपासून आजारी आहे, खूप ताप आणि उलट्या होत असल्यामुळे उर्फीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Urfi Javed
Liger song Aafat out : समुद्रकिनारा अन् विजय-अनन्याचा रोमान्स; सोशल मीडियावर 'आफत'

माहितीनुसार, मागील ३-४ दिवसांपासून उर्फीची तब्येत ठीक नव्हती. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फीला आज खूप ताप आणि उलट्या झाल्याने तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उर्फी जावेदच्या रक्त चाचण्याही केल्या जाणार आहेत. जेणेकरून तिच्या आजाराचे लवकर निदान होईल. उर्फी जावेद अनेकदा तिच्या आउटफिट्समुळे चर्चेत असते. ती अनेकदा अतरंगी ड्रेसिंगमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. यामुळे उर्फीला ट्रोलिंगलाही समोर जावे लागते.

Urfi Javed
Sushmita Sen : तू हॉट दिसतेस... सुष्मिता सेनचा स्विमिंग करतानाचा व्हिडिओ बघून ललित मोदी फिदा!

उर्फी जावेद अनेकदा तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या भन्नाट लूकने नेटिझन्सला आश्चर्यचकित करण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण-७' मध्येही तिचा उल्लेख करण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग उर्फीचे नाव घेत तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक करताना दिसला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com