Jab We Meet 2: १६ वर्षांनंतर करीना कपूर आणि शाहिद कपूर पुन्हा एकत्र?, लवकरच येणार ‘जब वी मेट’चा सीक्वेल...

Jab We Meet 2 News: १६ वर्षांनंतर शाहिद आणि करीनाच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जब वी मेट’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Jab We Meet 2
Jab We Meet 2Saam Tv

Jab We Meet 2

शाहिद कपूरचा आणि करीना कपूर खानच्या ‘जब वी मेट’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. चित्रपटातले गाणे आणि अनेक सीन्स आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘जब वी मेट’ हा चित्रपट ऑक्टोबर २००७ ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. फार मोठ्या कालावधीनंतर हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जब वी मेट’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘जब वी मेट’चा सिक्वेल बनवण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Jab We Meet 2
Shah Rukh Khan On Dunki: 'मेरी फिल्म आती है तब...' 'जवान'च्या पार्टीत शाहरूख खानने सांगितली 'डंकी'ची रिलीज डेट

एका मीडिया रिपोर्टनुसार, ‘जब वी मेट’चा सिक्वेल अष्टविनायकचे मालक राज मेहता गंधार फिल्म्स यांच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. ‘जब वी मेट’प्रमाणेच चित्रपटाच्या सिक्वेलचेही दिग्दर्शन इम्तियाज अलीच करणार आहेत. दरम्यान, ‘जब वी मेट २’ बाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या सोशल मीडियावर ‘जब वी मेट’च्या सिक्वेलची तुफान चर्चा होत आहे. (Bollywood Film)

Jab We Meet 2
Milind Gawali: ‘आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात...’ मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘जब वी मेट २’ ची चर्चा होत असताना, सध्या सोशल मीडियावर करीना कपूर खान गीताच्या भूमिकेत आणि शाहिद कपूर आदित्यच्या भूमिकेत दिसणार का? याची प्रचंड चर्चा होत आहे. ‘जब वी मेट’ काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला होता.

दरम्यान, शाहिद कपूरला ‘जब वी मेट २’या आयकॉनिक चित्रपटात तुला काम करायला आवडेल का, या प्रश्नावर शाहिदने उत्तर दिले की, हे स्क्रिप्टवर अवलंबून असते. जर चित्रपटाच्या कथेला अनुसरुनच पुढे कथा येत असेल, तर नक्कीच सिक्वेल येण्याची शक्यता आहे. शाहिदने चित्रपटासोबत अभिनत्री करीनाचे कौतुक केले. तिच्याशिवाय चित्रपटातली भूमिका कोणतीच अभिनेत्री साकारू शकत नाही, अशी त्याने प्रतिक्रिया दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com